Manoj Jarange Patil : जरांगे पाटील शरद पवारांचा माणूस; त्यांच्याच इशाऱ्यावर वागत आहे; बावसकर यांच्यानंतर आता संगीता वानखेडे यांचा आरोप

318
मराठा आरक्षणाचे आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्यावर बुधवार, २१ फेब्रुवारी रोजी त्याचे सहकारी अजय महाराज बावसकर यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर अनेक गंभीर आरोप केले आहेत. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी गुरुवार, २२ फेब्रुवारी जरांगे पाटील यांच्या आणखी एक सहकारी संगीता वानखेडे यांनी जरांगे पाटील यांच्यावर ‘ते शरद पवारांचा माणूस आहे, त्यांच्याच इशाऱ्यानुसार ते वागत आहेत’, असा थेट आरोप केला आहे.

काय म्हणाल्या संगीत वानखेडे? 

  • मनोज जरांगे (Manoj Jarange Patil) यांना शरद पवार यांचा फोन यायचा. त्यानुसार ते निर्णय घ्यायचे. ते कोणत्याही सहकारी किंवा समाजाला विचारून निर्णय घेत नव्हते, हे फक्त माध्यमांसमोर बोलताना तसे बोलायचे.
  • जेव्हा लाठीचार्ज झाला त्यानंतर आजी-माजी आमदार, नेतेमंडळी जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांना भेटायला येऊ लागले, तेव्हापासून महाराष्ट्र जरांगे पाटील यांना ओळखू लागला आहे. याआधी जरांगे पाटील कोण हे कुणालाही माहित नव्हते. तो लाठीचार्ज झाला, तेव्हा जी हिंसा घडवून आणली ती स्वतः जरांगे पाटलांनी घडवून आणली का, हेही तपासले पाहिजे, असे संगीत वानखेडे म्हणाल्या.

(हेही वाचा : Smita Thackeray : बाळासाहेब मला राज्यसभेवर पाठवणार होते; पण…; स्मिता ठाकरेंनी मुलाखतीमध्ये संवेदनशील विषयांवर केले भाष्य)

  • जेव्हा जेव्हा आजी माजी आमदार भेटायला यायचे तेव्हा जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) त्यांच्याशी नीट वागत नव्हते, तोऱ्यात होते, पण जेव्हा शरद पवार भेटायला आले तेव्हा मात्र जरांगे पाटील त्यांच्याशी आदबीने वागत होते. जरांगे पाटील हे सगळ्या नेत्यांना बोलायचे पण शरद पवार यांना कधी ते बोलले नाहीत.
  • जेव्हा मुंबईला मोर्चा येत होता तो पुण्यात आला तेव्हा त्याचे कोंढव्यात मुसलमानांनी स्वागत केले. त्यानंतर ते सगळे पुणे गोल टोपी घालून फिरत होते. त्यांना कुठे मंदिर दिसले नाही का, शरद पवारांना पटेल अशीही भूमिका आणि वर्तन जरांगे पाटील करत असतात.
  • सरकारने मराठा समाजाला १० टक्के आरक्षण दिले, त्यात काय वावगे आहे. स्वतंत्र आरक्षण मिळाले तर त्यात गैर काय? तीच मागणी होती ना, पण तरीही वाद निर्माण करत राहायचा, २०२४ पर्यंत हे वातावरण चिघळत ठेवायचे, हे शरद पवार यांच्या म्हणण्यानुसार सुरु आहे.
  • बावसकर यांच्या आरोपानंतर जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी असे आणखी १०-१५ जण पुढे येतील असे म्हणाले होते, हे खरेच आहेत, त्यांचा खोटारडेपणा लक्षात आलेले सहकारी समोर येणार आहेत.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.