भगतसिंग कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांनी राज्यपाल असताना त्यांच्या संबंधित असलेल्या संस्थांसाठी घेतलेल्या देणग्यांची माहिती त्यांच्या कार्यालयाशी संबंधित नाही, असे उत्तर महाराष्ट्राचे राज्यपाल यांचे परिवार प्रबंधक कार्यालयाने दिले आहे. या संदर्भात आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी माहितीच्या अधिकाराखाली अर्ज केला होता.
(हेही वाचा – Blackmailing Case : हॉटेल व्यावसायिकाला ब्लॅकमेल करून १५ कोटी रुपयांची खंडणी मागणाऱ्या सेक्रेटरीला अटक)
नेमकं प्रकरण काय ?
आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी भगतसिंग कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांनी राज्यपाल असताना त्यांच्या संबंधित असलेल्या सरस्वती शिशु मंदिर (पिठोरगड), विवेकानंद विद्या मंदिर इंटर कॉलेज (पिठोरगड) आणि सरस्वती विहार हायर सेकंडरी (नैनिताल) या शैक्षणिक संस्थेसाठी राज्यातील उद्योगपती, विकासक आणि अन्य लोकांकडून घेतलेल्या देणग्यांची सविस्तर माहिती मागितली होती. महाराष्ट्राचे राज्यपाल यांचे परिवार प्रबंधक कार्यालयाच्या कार्यालयीन अधिक्षिका यांनी स्पष्ट केले आहे की, मागितलेली माहिती त्यांच्या कार्यालयाशी संबंधित नाही तरी आपण संबंधित संस्थेशी संपर्क साधावा. अनिल गलगली यांनी राजभवनाने नाकारलेल्या आदेशाविरोधात प्रथम अपील दाखल केले आहे. गलगली यांचे म्हणणे आहे की, राज्यपाल यांनी राज्यपाल असताना खाजगी संस्थेसाठी देणग्या वसूल केल्या असून त्यांनी तशी माहिती राज्य सरकार आणि राज्यपालांचे परिवार प्रबंधक कार्यालयाकडे देणे आवश्यक होते. तशी माहिती न दिल्यास राज्यपालांचे परिवार प्रबंधक यांनी त्यांच्याकडे लेखी पत्र पाठवून माहिती मागवित ती माहिती अभिलेखावर जतन केली पाहिजे.
(हेही वाचा – Anil Desai : मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात माजी खासदार अनिल देसाईंच्या पीए विरोधात ईडीकडून गुन्हा दाखल)
अनिल गलगली यांच्या मते
राज्यपाल (Bhagat Singh Koshyari) असताना ज्या काही देणग्या वसूल करण्यात आल्या आहेत, त्याची माहिती राजभवनाकडे असणे आवश्यक होते. पण राज्यपालांनी गुपचूपपणे घेतलेल्या देणग्यांची माहिती लपवली आहे. याबाबत राज्य शासनाने चौकशी करणे अगत्याचे आहे, अशी मागणी अनिल गलगली यांनी विद्यमान राज्यपाल रमेश बैस यांसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community