MARD Doctors Strike : मार्ड डॉक्टरांच्या मागण्यांबाबत येत्या मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय

मार्डने संप मागे घ्यावा; उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आवाहन

165
MARD Doctors Strike : मार्ड डॉक्टरांच्या मागण्यांबाबत येत्या मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
MARD Doctors Strike : मार्ड डॉक्टरांच्या मागण्यांबाबत येत्या मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
मार्ड डॉक्टरांचे प्रश्न सुटावेत यासाठी राज्य सरकार कटिबद्ध असून त्यामुळेच गेल्या ७ फेब्रुवारीला सेंट्रल मार्ड (MARD Doctors Strike) संघटनेच्या मागण्यांबाबत बैठक घेऊन सर्वमान्य तोडगा काढण्यात आला होता. त्यानुसार तयार केलेल्या प्रस्तावाला मंत्रिमंडळाची मान्यता आवश्यक आहे. मात्र या आठवड्यात मंत्रिमंडळ बैठक (Cabinet meeting )झाली नसल्याने त्यावर निर्णय होऊ शकला नाही. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला येत्या रविवार होणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीत (Cabinet meeting) सदर प्रस्ताव मंजूर करण्यात येणार असल्याने मार्ड डॉक्टरांनी (MARD Doctors Strike) संपावर जाऊ नये, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार (DCM Pawar) यांनी गुरुवारी येथे केले. (MARD Doctors Strike)
राज्य सरकार मार्ड डॉक्टरांच्या मागण्यांबाबत सकारात्मक असल्याचे सांगत उपमुख्यमंत्री पवार (DCM Pawar) यांनी सेंट्रल मार्ड संघटनेचे (MARD Doctors Strike) अध्यक्ष डॉ.अभिजित हेलगे यांच्याशी दूरध्वनीवरून सविस्तर चर्चा केली.तसेच वस्तुस्थितीची माहीत दिली.राज्यातील रुग्णसेवा सुरळीत रहावी,रुग्णांना कोणताही त्रास होऊ नये म्हणून,मार्डने आज संध्याकाळ पासून सुरू होत असलेला त्यांचा संप मागे घ्यावा, या आवाहनचा पुनरुच्चारही उपमुख्यमंत्री पवार (DCM Pawar) यांनी मार्ड डॉक्टरांशी बोलताना केला.(MARD Doctors Strike)
गेल्या ७ फेब्रुवारीला मार्ड डॉक्टरांच्या (MARD Doctors Strike) मागण्यांसंदर्भात झालेल्या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले होते.या बैठकीत राज्यातील निवासी डॉक्टरांच्या विद्यावेतनात १० हजार रुपयांची भरीव वाढ करण्यासह त्यांचे विद्यावेतन प्रत्येक महिन्याच्या ठराविक तारखेला नियमितपणे देण्याचा निर्णय झाला होता.विद्यावेतन वाढीसंदर्भातील प्रस्ताव मंत्रिमंडळ बैठकीत (Cabinet meeting) सादर करण्याचे उपमुख्यमंत्री पवार DCM Pawar यांनी निर्देशही दिले होते. (MARD Doctors Strike)
सार्वजनिक बांधकाम विभागाने वसतिगृहांच्या दुरुस्तीची कामे तातडीने हाती घ्यावीत.विविध जिल्ह्यांत मंजूर करण्यात आलेल्या वसतिगृहांच्या बांधकामांना गती देण्यात यावी, असे निर्देश देऊन उपमुख्यमंत्री पवार (DCM Pawar) म्हणाले होते की,शासनाने नवीन वैद्यकीय महाविद्यालय मंजूर करताना त्याच्या आराखड्यात वसतिगृहाचा समावेश केला आहे.त्यामुळे नवीन महाविद्यालयांमधील डॉक्टरांना पहिल्या दिवसापासूनच चांगल्या दर्जाची वसतिगृहे उपलब्ध होणार आहेत. अस्तित्वातील वसतिगृहांच्या दुरुस्तीसाठीचा निधी वितरित करण्यात आला आहे. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने या कामाला प्राधान्य देऊन तातडीने दुरुस्तीची कामे सुरु करावीत. त्यात कोणत्याही प्रकारचा हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही, असा इशाराही उपमुख्यमंत्री पवार (DCM Pawar) यांनी दिला. (MARD Doctors Strike)
राज्यातील निवासी डॉक्टरांच्या वसतिगृहांची तातडीने दुरुस्ती करावी. वसतिगृहांच्या दुरुस्तीदरम्यान विद्यार्थ्यांना इतर ठिकाणी राहण्याची व्यवस्था करणे गरजेचे असते.मात्र, वैद्यकीय शिक्षण विभागाच्या रुग्णालयांच्या परिसरात पर्यायी मोकळ्या खोल्या मिळण्यात अडचणी येतात.अशा वेळी गरजेच्या ठिकाणी विद्यार्थ्यांना भाड्याने खोल्या घेऊन राहता येण्यासाठी ठराविक भाडे देण्यात यावे.शक्य असेल त्याठिकाणी त्यांना पर्यायी खोल्या उपलब्ध करून देण्यात याव्यात, अशा सूचनाही उपमुख्यमंत्री पवार (DCM Pawar) यांनी दिल्या. (MARD Doctors Strike)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.