Mumbai Slum : मुंबईतील झोपडपट्टीत  कचऱ्यासाठी धावणार रिक्षा

 घरोघरी कचरा संकलनासाठी ‘ई ऑटो रिक्षा’ची मदत

1654
Mumbai Slum : मुंबईतील झोपडपट्टीत  कचऱ्यासाठी धावणार रिक्षा
Mumbai Slum : मुंबईतील झोपडपट्टीत  कचऱ्यासाठी धावणार रिक्षा

मुंबईत घरोघरी कचरा (garbage) संकलन करण्यासाठी सध्या सुरु असलेल्या स्वच्छ (Mumbai Slum) मुंबई प्रबोधन अभियान बंद करून त्याठिकाणी एकाच संस्थेची नेमणूक करून कचऱ्यांसह (garbage) शौचालयांची सफाई करण्यासाठी कंत्राट देण्याचा घाट महापालिका (BMC) प्रशासनाने घातला आहे. याची वातावरण निर्मिती करण्याच्या दृष्टीकोनातून आता महापालिका (BMC) प्रशासनाने झोपडपट्टी परिसरांमध्ये ई ऑटो रिक्षांचा पर्याय अवलंबवण्यास सुरुवात केली आहे. मुंबईतील (Mumbai Slum) सर्वात दाटीवाटीची झोपडपट्ठी असलेल्या एम पूर्व विभागातील गोवंडी, शिवाजीनगर, चिता कॅम्प परिसरात सध्या प्रायोगिक तत्वावर सुरु केलेल्या तीन ई-रिक्षांचा वापर करत घरोघरी जावून कचरा संकलन करण्याचे काम केले जात आहे.(Mumbai Slum)

लवकरच डि विभागात होणार वापर

घरगुती कचरा (garbage) संकलनावर भर देतानाच धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे निर्देश मुंबई महानगरपालिका (BMC) आयुक्त तथा प्रशासक डॉ. इकबाल सिंह चहल आणि अतिरिक्त आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. सुधाकर शिंदे (Dr. Sudhakar Shinde) यांनी दिले होते. त्यानुसार झोपडपट्टीबहुल भागात स्वच्छतेच्या अनुषंगाने ‘ई ऑटो रिक्षा’चा पथदर्शी प्रकल्प राबविण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसारच अतिशय दाटीवाटीच्या आणि घनदाट लोकसंख्येच्या ‘एम पूर्व’ विभागात पहिल्यांदा ‘ई ऑटो रिक्षा’ (E -Rikshaw) चा वापर सुरु करण्याचे निर्देश देण्यात आले होते. या पथदर्शी प्रकल्पाला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याने येत्या काळात आणखी भागात अशा स्वरूपाची वाहने वापरण्यात येतील, अशी माहिती प्रमुख अभियंता (घनकचरा व्यवस्थापन) प्रशांत तायशेटे यांनी दिली. लवकरच डी विभागातही ‘ई ऑटो रिक्षा’ (E -Rikshaw) चा वापर करण्यात येणार आहे, असेही तायशेटे म्हणाले. (Mumbai Slum)

(हेही वाचा- lok sabha election 2024 : महाराष्ट्रातील पेच लवकर सोडवला जाईल; जयंत पाटील यांची माहिती )

वाहतूक कोंडीतून मार्ग काढण्यासाठी

‘एम पूर्व’ विभागात गोवंडी, शिवाजी नगर आणि चिता कॅम्प या भागात ‘ई ऑटो रिक्षा’ (E -Rikshaw) चा वापर या पथदर्शी प्रकल्प अंतर्गत करण्यात येत आहे. झोपडपट्टी तसेच दाटीवाटीची वस्ती असणाऱ्या या भागात मोठ्या जीपसारखी वाहने नेण्यासाठी तसेच वाहतूक कोंडीतून मार्ग काढण्यासाठी अनेक अडथळ्यांचा सामना करावा लागत होता. त्यामुळेच गल्लीबोळात पोहचण्यासाठी आकाराने छोट्या ई ऑटो रिक्षांचा (E -Rikshaw) वापर करण्याची संकल्पना सुचली. त्यानुसार तीन ई ऑटो रिक्षांचा (E -Rikshaw) वापर सध्या ‘एम पूर्व’ विभागात करण्यात येत आहे. (Mumbai Slum)

आणखी तीन ‘ई ऑटो रिक्षा’ या भागासाठी खरेदी

‘ई ऑटो रिक्षा’ (E -Rikshaw)च्या माध्यमातून कचरा (garbage) संकलन करणे हे महानगरपालिकेला (BMC) जसे प्रत्येक गल्लीच्या ठिकाणी सोयीचे झाले आहे, तसे नागरिकांना देखील कचरा (garbage) टाकणे हे सोयीचे ठरते आहे. नागरिकांच्या घरा शेजारी ‘ई ऑटोरिक्षा’मध्ये कचरा टाकण्याची सुविधा झाल्याने इतरत्र टाकण्यात येणाऱ्या कचऱ्याचे प्रमाण कमी झाले आहे. गल्लीबोळातही या ऑटोरिक्षा (E -Rikshaw) सहजपणे जात असल्याने वाहतूक कोंडीच्या समस्येवरही हा चांगला पर्याय उपलब्ध झाला आहे. घरोघरी कचरा  गोळा करण्यासाठी अवलंबण्यात आलेल्या धोरणानुसार झोपडपट्टीबहुल परिसरात कचरा (garbage) संकलनाची सुविधा देण्याचे उद्दिष्ट घनकचरा विभागाने ठेवले आहे. त्यानुसार आणखी तीन ‘ई ऑटो रिक्षा’ या भागासाठी खरेदी करण्यात येणार आहेत. (Mumbai Slum)

(हेही वाचा- Sandeshkhali : तृणमूलचे लोक रात्री २ वाजता बोलवायला यायचे; संदेशखालीच्या पीडित महिलांचा आक्रोश )

वातावरण निर्मिती

मुंबईमधील झोपडपट्टी (Mumbai Slum) परिसरांमध्ये कचरा (garbage) संकलनासह स्वच्छता राखणे तसेच शौचालयांमध्ये स्वच्छता राखण्यासाठी महापालिका (BMC) प्रशासनाच्यावतीने एकाच संस्थेची नेमणूक करण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या स्वच्छ मुंबई प्रबोधन अभियानांतर्गत झोपडपट्टयांच्या स्वच्छतेसाठी महिला बचत गट तसेच महिला संस्था आणि इतर संस्थांची नेमणूक करण्यात आलेली आहे. परंतु आता या संस्थांना हद्दपार करून प्रशासकीय विभाग कार्यालयांसाठी एक याप्रमाणे किंवा शहर, पूर्व उपनगरे आणि पश्चिम उपनगरांसाठी प्रत्येकी एक याप्रमाणे संस्थेची नेमणूक करण्याचा निर्णय घेण्यात येत आहे. यासाठीची निविदा प्रक्रिया सुरु असून त्याचा एक भाग म्हणून पूर्व उपनगरातील एम पूर्व  विभागातील झोपडपट्ट्यांमध्ये ई रिक्षांचा (E -Rikshaw) वापर घरोघरी कचरा (garbage) संकलनासाठी करून एकप्रकारे अत्याधुनिक पध्दतीने ही योजना राबवली जाईल अशाप्रकारचा संदेश देत वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न महापालिका (BMC) प्रशासनाकडून सुरु असल्याचे स्पष्ट दिसत आहे.

‘ई ऑटो रिक्षा’चे फायदे

‘ई व्हेईकल’ (E -Rikshaw) मुळे कोणतेही प्रदूषण होत नाही. तसेच बॅटरी पॉवर्ड इलेक्ट्रिक मोटरचा वापर होत असल्याने कोणतेही इंधन ज्वलनाची प्रक्रिया या वाहनांसाठी होत नाही. परिणामी कार्बन उत्सर्जन होत नाही. ई-वाहने ही चार्जिंग करण्यासाठी चौकीच्या ठिकाणी सहज वापराचा पर्याय आहे. तसेच या वाहनांपासून कोणताही आवाज निर्माण होत नाही. पारंपरिक इंजिनपेक्षा या मोटरसाठी देखभाल आणि दुरूस्तीचा येणारा खर्च तुलनेत कमी आहे. थोडक्यात सर्वार्थाने हा पर्याय उपयुक्त आहे.(Mumbai Slum)

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.