Narayan Rane यांनी घेतली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट

204
Narayan Rane यांनी घेतली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट
Narayan Rane यांनी घेतली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट
केंद्रिय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांची भेट घेतली आहे. सहयाद्री अतिथीगृह येथे ही भेट झाली. मात्र ही भेट पूर्णपणे वैयक्तिक स्वरूपाची होती तसेच दोघांमध्ये बंद दाराआड चर्चा झाल्याने या भेटीबाबत विविध तर्क लावण्यात येत आहेत. नारायण राणे (Narayan Rane) हे रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढविणार असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. तसे असल्यास त्यांना महायुतीतील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या नेत़त्वाखालील शिवसेनेची मदत लागणार आहे. त्यासाठीच ही भेट असल्याचे मानण्यात येत आहे.

(हेही वाचा- Mumbai Slum : मुंबईतील झोपडपट्टीत  कचऱ्यासाठी धावणार रिक्षा )

नारायण राणे (Narayan Rane) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांची भेट घेण्यामागे निश्चितच राजकीय कंगोरे आहेत. कारण नुकत्याच झालेल्या राज्यसभा निवडणुकीत नारायण राणेंना (Narayan Rane) पुन्हा एकदा उमेदवारी देण्यात आलेली नाही. रत्नागिरी सिंधुदुर्ग या लोकसभा मतदारसंघातून त्यांनी निवडणूक लढवावी असे त्यांना पक्षातील वरिष्ठांकडून सांगण्यात आल्याचे समजते. तसे झाल्यास नारायण राणेंना (Narayan Rane) महायुतीतील सर्वच पक्षांची मदत घ्यावी लागणार आहे. कारण आतापर्यंत या मतदारसंघातून उदयोगमंत्री उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत इच्छुक आहेत अशीच चर्चा होती. किरण सामंत यांनी तसे स्पष्ट संकेतही दिले होते. किरण सामंत उभे राहिल्यास अर्थातच ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या (CM Eknath Shinde) शिवसेनेतून उभे राहतील. किरण सामंत यांना उमेदवारी नाकारत जर नारायण राणे (Narayan Rane) उभे राहिले तर त्याचा परिणाम मतदानावर होईल का याचीही शंका आहे. कारण रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग पटटयात सामंत बंधूंची ताकद आहे. उदय सामंत तर मंत्री आहेतच पण किरण सामंत देखील सक्रिय असतात. उदय सामंत यांच्या विजयात किरण सामंत यांचे मोठे योगदान असते. किरण सामंत यांचा स्वत:चाही चांगला जनसंपर्क आहे.

या सर्व फॅक्टरचा विचार करता नारायण राणे (Narayan Rane) यांना जर उभे राहायचे असेल तर मुख्यमंत्री शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या शिवसेनेची साथ घेणे आवश्यक ठरणार आहे. कारण शिवसेनेत बंडाळी झाल्यानंतरही कोकणातील सामान्य शिवसैनिक हा मोठया प्रमाणावर उदधव ठाकरे यांच्यासोबतच आहे. खासदार विनायक राउत यांचा जनसंपर्कही चांगला आहे. त्यामुळे जर नारायण राणे (Narayan Rane) उभे राहणार असतील तर ही निवडणूक रंगतदार ठरणार हे निश्चित आहे. कारण नारायण राणे (Narayan Rane) आणि उदधव ठाकरे यांच्यातील संघर्ष सर्वश्रुत आहे. निवडणुकीच्या रूपाने या संघर्षाला पुन्हा एकदा धार चढेल.

हेही पहा-
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.