विशेष प्रतिनिधी,मुंबई
माहिम- दादर परिसरातील सफाई कामगारांची सर्वांत मोठी वसाहत असलेल्या कासारवाडीचा (Dadar Kasarwadi) आता कायापालट होत असून या वसाहतीचा मेकओवर जात आहे. त्यामुळे आजवर छोट्याशा कोंदट वातावरणात राहणाऱ्या या कुटुंबांना चांगल्याप्रकारच्या सेवा सुविधांसह मोकळ्या वातावरणात राहण्याचा आनंद मिळणार आहे, शिवाय येथील रहिवाशांसाठी उद्यान आणि खेळाच्या मैदानासह अभ्यासिकांची सुविधाही उपलब्ध करून देण्यात येत आहे. (Dadar Kasarwadi)
मुंबई महापालिकेच्या सफाई कामगारांच्या वसाहतींचा पुनर्विकास सध्या आश्रय योजनेतंर्गत हाती घेण्यात आलेला प्रकल्प रद्द करण्यात आल्यानंतर दादर कासारवाडी (Dadar Kasarwadi) येथील या वसाहतीला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्थानिक खासदार राहुल शेवाळे आणि स्थानिक आमदार सदा सरवणकर यांच्या सुचनेनुसार भेट दिली. त्यानंतर सफाई कामगारांच्या घरांची पाहणी केल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी यासर्व वसाहतींची तात्काळ दुरुस्ती करून त्या भागाला जास्तीत जास्त सेवा सुविधा दिल्या जाव्यात,असे निर्देश दिले.
(हेही वाचा – Haldwani Violence : दंगलखोरांना वाटले पैसे; सलमान खान पोलिसांच्या रडारवर)
मुंबईची घाण साफ करून जनतेच्या आरोग्याची काळजी घेणाऱ्या सफाई कामगारांच्या कुटुंबाची काळजी घेण्याची महापालिकेची आणि पर्यायाने सरकारची जबाबदारी आहे. त्यामुळे या वसाहतींमधील कुटुंबांच्या घरांची डागडुजीसह वसाहतींमध्ये चांगल्याप्रकारे सेवा सुविधा देण्याचे निर्देश त्यांनी प्रशासनाला दिले होते. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानुसार महापालिका प्रशसनाने या (Dadar Kasarwadi) वसाहतीच्या दुरुस्तीसाठी २४ कोटी रुपयांची तरतूद केली आहे.
त्यानुसार आता पर्यंत महापालिका प्रशासनाच्यावतीने कासारवाडीतील आय इमारत, एच इमारत, इमारत क्रमांक सहा, सहा नवीन, सात, आठ आणि ए चाळ आदींसह उद्यान व केडब्ल्यूसी मैदानाच्या विकासाची कामे हाती घेतली. यासाठी तब्बल सात कोटींहून अधिक खर्च केले. (Dadar Kasarwadi)
याशिवाय बाहेरील जागेतील न्हाणीघराची व्यवस्था घरातील जागेत करण्यासह सार्वजनिक शौचालयांची बांधकामे करून त्यातील शौचकुपांची संख्या वाढवणे आदींची कामे हाती घेण्यात येत आहे.
अशाप्रकारे कासारवाडी इमारतींची दुरुस्ती, डागडुजीसह उद्यानांची कामे
(हेही वाचा – Narayan Rane यांनी घेतली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट)
कासारवाडी ए चाळ
कंत्राटदार :एस आर के इन्फ्राप्रोजेक्ट
कामाचा खर्च : ८९ लाख ६८ हजार रुपये
कासारवाडी आय इमारत
कंत्राटदार : सदगुरु एंटरप्रायझेस
कामाचा खर्च : ७८ लाख ३९ हजार रुपये
कासारवाडी इमारत क्रमांक ७
कंत्राटदार : सदगुरु एंटरप्रायझेस
कामाचा खर्च : ८४ लाख ४० हजार रुपये
कासारवाडी इमारत क्रमांक ६
कंत्राटदार : शाह अँड इन्फ्रा डेव्हलपमेंट
कामाचा खर्च : १ कोटी ०४ लाख रुपये
कासारवाडी एच इमारत
कंत्राटदार : वितराग एंटरप्रायझेस
कामाचा खर्च : ७९ लाख ३३ हजार रुपये
कासारवाडी इमारत क्रमांक ८
कंत्राटदार : एस.आर.के, इन्फ्राप्रोजेक्ट
कामाचा खर्च : १ कोटी ०६ लाख रुपये
कासारवाडी इमारत क्रमांक ६ नवीन
कंत्राटदार : ओमकार इंजिनिअर्स
कामाचा खर्च : ५६ लाख ८४ हजार रुपये
कासारवाडी उद्यान
कंत्राटदार : शाह इन्फ्रा डेव्हलपमेंट
कामाचा खर्च : ५१ लाख ०४ हजार रुपये
कासारवाडी केडब्लुसी मैदान
कंत्राटदार : ओमकार इंजिनिअर्स
कामाचा खर्च : ५४. ८२ लाख रुपये
हेही पहा –
Join Our WhatsApp Community