२२ जानेवारी हा दिवस भारताच्या इतिहासात सुवर्णदिन ठरला. अयोध्येतील रामजन्मभूमीवर उभारण्यात आलेल्या भव्य राममंदिरात रामलल्लाची या दिवशी प्रतिष्ठापना करण्यात आली. आज या ऐतिहासिक घटनेला १ महिना पूर्ण झाला आहे. असे असूनही रामलल्लाच्या दर्शनासाठी भक्तांचे लोंढे अयोध्येकडे येतच आहेत. (Ayodhya Ram Mandir)
(हेही वाचा – Dadar Kasarwadi : दादर कासारवाडीतील रहिवाशांचे जीवनमान उंचावतेय)
बालरूपातील रामलला दर्शन घेण्यासाठी अयोध्येत लाखोंच्या संख्येने भाविक येत आहेत. दररोज लाखो भक्त रामदर्शन घेत आहेत. दानधर्मही मोठ्या प्रमाणावर केला जात आहे. गेल्या महिन्याभरात सुमारे ६२ लाख भाविकांनी अयोध्येत येऊन रामलल्लाचे दर्शन घेतल्याचे सांगितले जात आहे. देशभरातून आस्था ट्रेनमधून (Aastha Special Train) दररोज जवळपास १० ते १५ हजार भाविक अयोध्येत पोहोचत आहेत.
भाविकांमध्ये अभूतपूर्व उत्साह
अयोध्येत येणाऱ्या भाविकांचा उत्साह त्यांच्या प्रसन्न चेहऱ्यावर दिसून येतो. रामललाचे दर्शन घेण्यासाठी देश-विदेशातून भाविक येत आहेत. सर्वांना रामदर्शनाची उत्सुकता आहे. त्यांच्या चेहऱ्यावर थकवा दिसत नाही. दर्शन घेताच चेहऱ्यावरील आनंद अवर्णनीय असतो.
‘रामललाचे दर्शन घेतल्यानंतर ज्येष्ठांच्या डोळ्यात पाणी तरळते. आनंदाश्रूंसह ते बाहेर येतात. भाविकांमध्ये अभूतपूर्व उत्साह आहे’, अशी प्रतिक्रिया श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे (Shri Ram Janmabhoomi Teerth Kshetra) सदस्य डॉ.अनिल मिश्रा यांनी दिली आहे.
राममंदिराच्या पहिल्या मजल्यावरील कामे जवळपास पूर्ण झाली असून आता दुसऱ्या मजल्याचे काम सुरू झाले आहे. संपूर्ण मंदिर तीन टप्प्यांत पूर्ण होणार आहे. (Ayodhya Ram Mandir)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community