Manohar Joshi : माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचे निधन

520
Manohar Joshi : सुसंस्कृत, व्यासंगी नेतृत्वाला महाराष्ट्र मुकला - मुख्यमंत्री शिंदे

माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी (Manohar Joshi) यांचे निधन २३ फेब्रुवारी २०१४ रोजी पहाटे ३.०२ मिनिटांनी हिंदुजा हॉस्पिटलमध्ये झाले. २१ फेब्रुवारी रोजी त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने हिंदुजा हॉस्पिलमध्ये दाखल करण्यात आले होते. त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याचे निदान झाल्याने त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. अंत्यदर्शनासाठी त्यांचे पार्थिव माटुंगा पश्चिम, रुपारेल कॉलेज जवळील W54 या त्यांच्या सध्याच्या निवासस्थानी सकाळी ११ ते दुपारी २ या वेळात ठेवण्यात येणार आहे.

(हेही वाचा J. P. Nadda : दीर्घकाळ सत्ता उपभोगणाऱ्या काँग्रेसला गरिबी हटवता आली नाही; जे.पी. नड्डा यांचा काँग्रेसवर घणाघात)

दादर स्मशान भूमीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार 

दुपारी २ नंतर अंत्ययात्रा सुरू होईल. दादर स्मशान भूमीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होतील. मनोहर जोशी यांचा जन्म २ डिसेंबर १९३७ रोजी रायगड जिल्ह्यातील नांदवी या गावी झाला. १९९५ या वर्षी ते युतीच्या सत्तेत राज्याचे मुख्यमंत्री होते. मनोहर जोशी (Manohar Joshi) यांनी मुंबई महापालिकेचे नगरसेवक, महापौर, विधान परिषदेचे सदस्य, आमदार, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, खासदार, केंद्रीय अवजड उद्योगमंत्री, लोकसभा अध्यक्ष आणि राज्यसभा सदस्य अशा विविध पदांवर काम केलं आहे. आजारपणामुळे ते गेल्या काही महिन्यांपासून राजकारणात सक्रिय नव्हते.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.