Sharad Pawar : शरद पवार गटाला मिळाले तुतारी निवडणूक चिन्ह

436
शरद पवार (Sharad Pawar) गटाला निवडणूक आयोगाने तुतारी हे नवे निवडणूक चिन्ह देण्यात आले आहे. निवडणूक आयोगाने गुरुवारी हे चिन्ह पक्षाला बहाल केले. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर खरा पक्ष कुणाचा हा वाद केंद्रीय निवडणूक आयोगाकडे गेला होता. त्यावर निवडणूक आयोगाने पक्षाचे मूळ नाव राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ हे पक्षाचे मूळ चिन्ह अजित पवार गटाला दिले होते. तर राज्यसभा निवडणुकीपूर्वी ‘राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्ष’ हे नाव शरद पवार गटाला दिले होते.
मात्र निवडणुकीसाठी शरद पवार (Sharad Pawar) गटाने चिन्हाची मागणी निवडणूक आयोगाकडे केली होती. त्यानुसार आयोगाने तुतारी हे चिन्ह शरद पवार गटाला दिले आहे. हे चिन्ह मिळाल्यानंतर राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी एक्सवर प्रतिक्रिया देताना कविता पोस्ट केली आहे. ‘भेदुनि टाकिन सगळी गगने “एक तुतारी द्या मज आणुनिफुंकिन मी जी स्वप्राणानेभेदुनि टाकिन सगळी गगनेदीर्घ जिच्या त्या किंकाळीनेअशी तुतारी द्या मजलागुनी! ““महाराष्ट्राच्या इतिहासात छत्रपती शिवरायांच्या शौर्यानं ज्या तुतारीने दिल्लीच्या तख्ताच्याही कानठळ्या बसवल्या होत्या, तीच ‘तुतारी’ आज निवडणूक चिन्ह म्हणून निश्चित होणे ही ‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष- शरदचंद्र पवार’साठी गौरवास्पद बाब आहे. महाराष्ट्राचं आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज, फुले, शाहू, आंबेडकरांच्या पुरोगामी विचारांनी, खा. शरदचंद्र पवार (Sharad Pawar) यांच्या साथीने दिल्लीच्या तख्ताला हादरवून सोडण्यासाठी हीच ‘तुतारी’ पुन्हा एकदा रणशिंग फुंकण्याकरिता सज्ज आहे!” असे ट्विट राष्ट्रवादी काँग्रेसने केले.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.