- ऋजुता लुकतुके
बायजू कंपनीचे संस्थापक रवींद्रन यांच्यासमोरच्या अडचणी वाढत चालल्या आहेत. आता कंपनीच्या काही भागधारकांनी एक विशेष सर्वसाधारण सभा बोलावली आहे. आणि अर्थातच इथं कंपनीचं अपयश आणि व्यवस्थापकांवरील अनियमिततेचे आरोप हाच सभेचा विषय असणार आहे. पण, रवींद्रन आणि त्यांच्या निकटवर्तीय तसंच कुटुंबीयांनी या सभेला गैरहजर राहण्याचं ठरवलं आहे. (Byju Raveendran)
उलट रवींद्रन यांनी ही बैठक बेकायदेशीर असल्याचं म्हटलं आहे. तर बायजू कंपनीने उच्च न्यायालयातील एक सुनावणीचा आधार घेतला आहे. पुढील सुनावणीपर्यंत कंपनीत कुठलीही विशेष सभा होऊ नये असं कोर्टाने म्हटल्याचा रवींद्रन यांचा दावा आहे. (Byju Raveendran)
🚨Byju’s EGM today: Investors to vote on founder ouster, share transfer restriction, forensic probe, and other resolutions
By @Unibrowverse
https://t.co/nNb2ERjtHX via @moneycontrolcom— Chandra R. Srikanth (@chandrarsrikant) February 23, 2024
(हेही वाचा – Manohar Joshi : हिंदुत्वाच्या आधारे मते मागितल्याने मनोहर जोशींना १९९१ मध्ये सोडावी लागलेली आमदारकी)
हा आहे गुंतवणूकदारांचा आरोप
बायजू कंपनीवर कंपनीतील महत्त्वाची माहिती गुंतवणूकदारांपासून लपवल्याचा आरोप आहे. २०२१ मध्ये कंपनीने नवीन कंपनी ताब्यात घेण्यासाठी ९५० दशलक्ष अमेरिकन डॉलरचा करार केला. यातील ७० टक्के रक्कम ही रोखीने दिली जाणार होती. पण, हा महत्त्वाचा करार रवींद्रन यांनी गुंतवणूकदारांपासून लपवून ठेवल्याचा आरोप आहे. (Byju Raveendran)
कंपनीचा ताळेबंदातही काही व्यवहार उघड न केल्याचा गुंतवणूकदारांचा आरोप आहे. थोडक्यात कंपनीचा गुंतवणूकदारांशी असलेला करार कंपनीने वेळोवेळी मोडला असल्याचा ठपका गुंतवणूकदारांनी बायजू आणि पर्यायाने रवींद्रन यांच्यावर ठेवला आहे. (Byju Raveendran)
यावर चर्चा करण्यासाठीच काही गुंतवणूकदारांनी ही विशेष सभा बोलावली आहे. कंपनीचे सीईओ, सीएफओ अशा पदांवर काम करणाऱ्या लोकांचं स्टेटस काय आहे. आणि प्रशासकीय कामांसाठी बाहेरून सीईओ, सीएफओ यांची नियुक्ती करावी का यावरही या विशेष बैठकीत चर्चा अपेक्षित आहे. अर्थात, चर्चा काहीही झाली तरी संस्थापक रवींद्रन या बैठकीला असणार नाहीत. आणि झालेल्या निर्णयांना ते विरोध करणार हे नक्की. (Byju Raveendran)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community