Sandeshkhali Violence : महिलांवर अत्याचार करणाऱ्या शाहजहा शेखच्या घरावर ईडीचे छापे

शुक्रवारी सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास ईडीच्या अधिकाऱ्यांनी हावडातील हल्दरपारा आणि कोलकात्यातील विजयगड येथील पत्त्यावर छापे टाकण्यास सुरुवात केली. इतर चार ठिकाणी शोधमोहीम सुरू आहे.

241
Sandeshkhali Violence : महिलांवर अत्याचार करणाऱ्या शाहजहा शेखच्या घरावर ईडीचे छापे

अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) पुन्हा एकदा संदेशखली (Sandeshkhali Violence) येथील फरार तृणमूल नेते शाहजहान शेख (Shah Jahan Sheikh) यांच्याशी संबंधित ठिकाणावर छापा टाकला आहे. आयात-निर्यात व्यवसायाशी संबंधित प्रकरणाच्या आधारे ईडीने शुक्रवार २३ फेब्रुवारी रोजी शाहजहानच्या जवळच्या व्यावसायिकांच्या घरांवर छापे टाकण्यास सुरुवात केली. केंद्रीय तपास संस्थेचे अधिकारी सध्या हावडा, कोलकाता, उत्तर २४ परगणासह एकूण सहा ठिकाणी शोध घेत आहेत.

(हेही वाचा – Sandeshkhali : तृणमूलचे लोक रात्री २ वाजता बोलवायला यायचे; संदेशखालीच्या पीडित महिलांचा आक्रोश)

ईडीच्या एका अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार,

त्यांनी आयात-निर्यात व्यवसायातील अनियमिततेबाबत नव्याने ईसीआयआर किंवा तक्रार दाखल केली आहे. त्या आधारे तपास सुरू करण्यात आला. ही गुंतवणूक जाहिरात किंवा आयात-निर्यात व्यवसायात करण्यात आली होती की नाही याचा तपास ईडीचे अधिकारी करत आहेत. मासे किंवा इतर वस्तू सीमेपलीकडे निर्यात केल्या गेल्या की नाही याचीही चौकशी केली जात आहे. (Sandeshkhali Violence)

सकाळी ७ पासून ईडीच्या कारवाईला सुरुवात

शुक्रवारी सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास ईडीच्या अधिकाऱ्यांनी हावडातील हल्दरपारा आणि कोलकात्यातील विजयगड येथील पत्त्यावर छापे टाकण्यास सुरुवात केली. इतर चार ठिकाणी शोधमोहीम सुरू आहे. ईडीच्या अधिकाऱ्यांसोबत केंद्रीय दलाचे कर्मचारी असतात. (Sandeshkhali Violence)

(हेही वाचा – Manohar Joshi : राजकारणाचा सुसंस्कृत चेहरा हरवला – नितीन गडकरी)

शाहजहानच्या निकटवर्तीय व्यावसायिकाच्या घराची झडती

हावडातील हलदेरपाडा येथील पार्थप्रतिम सेनगुप्ता नावाच्या व्यावसायिकाच्या घराची झडती घेतली जात आहे. स्थानिक सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हा वृद्ध व्यापारी मासेमारीशी संबंधित आहे. विजयगड येथील आणखी एक व्यापारी अरूप सोम याच्या घराची झडती घेतली जात आहे. केंद्रीय तपास संस्थेच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शाहजहान या व्यावसायिकांच्या संपर्कात होता. हे व्यापारी प्रामुख्याने आयात-निर्यात व्यवसाय करतात. (Sandeshkhali Violence)

भाजपचा ममता बॅनर्जी सरकारवर गंभीर आरोप

भाजपने गुरुवार, 22 फेब्रुवारी रोजी बंगालमधील (Bengal) संदेशखाली (Sandeshkhali Violence) येथील महिलांच्या लैंगिक छळाच्या प्रकरणी त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर एक माहितीपट प्रदर्शित केला आहे. भाजपने या व्हिडिओखाली कॅप्शनमध्ये लिहिले की, संदेशखालीचे असे सत्य ज्याने तुम्हाला धक्का बसेल ! अंतरात्म्याला हादरवून सोडणारे सत्य. ममता बॅनर्जी हे सत्य लपवण्याचा प्रयत्न करत आहेत.

(हेही वाचा – Byju Raveendran : बायजू समभागधारकांनी बोलावलेल्या बैठकीला रवींद्रन जाणार का?)

टीएमसीचे लोक मुलींचे सौंदर्य पाहून घेऊन जायचे

भाजपच्या २० मिनिटे ४१ सेकंदाच्या माहितीपटात संदेशखाली येथील महिला त्यांचे अनुभव कथन करत आहेत. यामध्ये एका महिलेने दावा केला आहे की, तृणमूल काँग्रेसचे (Trinamool Congress) नेते शिबू हाजरा तिला घरातून उचलायचे. टीएमसीचे लोक मुलींचे सौंदर्य पाहून घेऊन जायचे. मुली त्यांच्यासाठी मनोरंजनाचे साधन होते. (Sandeshkhali Violence)

काय आहे संदेशखली प्रकरण ?

संदेशखालीच्या (Sandeshkhali Violence) महिलांनी सांगितले की, शाहजहान शेखचे लोक मीटिंगच्या नावाखाली जबरदस्तीने पक्ष कार्यालयात बोलावत होते. मीटिंगनंतर ते पुरुषांना घरी पाठवायचे आणि महिलांना तिथेच ठेऊन घ्यायचे. त्यांच्यासोबत चुकीचे काम करायचे. कोणत्याही महिलेने कार्यालयात येण्यास नकार दिल्यास तिच्या पतीला घेऊन जात असत.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.