Mohammed Shami : मोहम्मद शामी आयपीएलच्या अख्ख्या हंगामाला मुकणार

पायाच्या विचित्र दुखापतीमुळे तो एकदिवसीय विश्वचषकानंतर क्रिकेटपासून दूर आहे. 

195
Mohammed Shami : दुखापतीनंतर क्रिकेटच्या मैदानावर परतण्यासाठी मोहम्मद शामी उत्सुक
  • ऋजुता लुकतुके

मोहम्मद शामी आगामी आयपीएलमध्ये दुखापतीमुळे खेळू शकणार नाही. अलीकडे त्याच्या डाव्या पायाचा घोटा त्याला त्रास देत होता. आणि आता तो लंडनमध्ये त्यावर शस्त्रक्रिया करून घेणार आहे. ३० वर्षीय शामी नोव्हेंबरच्या एकदिवसीय विश्वचषकाच्या अंतिम स्पर्धेत शेवटचं स्पर्धात्मक क्रिकेट खेळला होता. शामीच्या पायात घोट्याजवळचे स्नायू थोडेसे ताठर झाले आहेत. आणि त्यामुळे तो धावू शकत नाहीए. ही बाहेरून झालेली दुखापत नाही तर शरीरातील एक अवस्था आहे, असं बीसीसीआयच्या वैद्यकीय टीमने पूर्वी सांगितलं होतं.

त्यानंतर जानेवारी महिन्यात उपचारांसाठी शामी लंडनलाही गेला होता. तिथे त्याला ठरावीक पद्धतीची इंजेक्शन देण्यात आली. पण, तरीही दुखापत बरी झालेली नाही. त्यामुळे आता त्याला शस्त्रक्रियाच करावी लागणार आहे.

(हेही वाचा – Byju Raveendran : बायजू समभागधारकांनी बोलावलेल्या बैठकीला रवींद्रन जाणार का?)

शामी आता दीर्घ काळासाठी क्रिकेटपासून दूर राहणार

बीसीसीआयमधील सूत्रांनी पीटीआय वृत्तसंस्थेला ही माहिती दिली आहे. गेल्यावर्षी झालेल्या एकदिवसीय विश्वचषकात शामीने सर्वाधिक २४ बळी टिपले होते. आणि भारतीय संघाच्या सलग १० सामने जिंकण्याच्या कामगिरीत त्याचा मोलाचा वाटा होता. या स्पर्धेदरम्यानच त्याचा घोटा दुखत होता. आणि गोलंदाजीसाठी पाय क्रीझमध्ये रोवताना त्याला दुखत होतं. पण, तेव्हा तो वेदनाशामक गोळ्या घेऊन खेळला. आणि या दुखापतीचा त्याने कामगिरीवर परिणाम होऊ दिला नाही.

शामी आता दीर्घ काळासाठी क्रिकेटपासून दूर राहणार आहे. आणि कसोटी क्रिकेटमध्ये तो कधी परतेल हे ही सांगता येणार नाही. बांगलादेश आणि न्यूझीलंड विरुद्धच्या कसोटी मालिका तो खेळण्याची शक्यता कमीच आहे. त्यानंतर भारतीय संघ ऑस्ट्रेलियाचा दौरा करणार आहे. तेव्हा तो भारतीय संघात परतू शकेल. शामी आयपीएलमध्ये गुजरात टायटन्स या संघाकडून खेळतो. मोहम्मद शामीला अलीकडेच अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. शामीच्या खात्यात २२९ कसोटी बळी, १९४ एकदिवसीय बळी आणि २४ टी-२० आंतरराष्ट्रीय बळी आहेत.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.