- ऋजुता लुकतुके
दक्षिण कोरियात बुसान इथं सुरू असलेल्या टेबल टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत भारतीय महिला व पुरुषांच्या संघाचं आव्हान उपउपान्त्य फेरीतच संपुष्टात आलं आहे. पण, तरीही संघाला पॅरिस ऑलिम्पिक पात्रतेची संधी आहे. मनिका बात्राच्या नेतृत्वाखाली महिलांचा संघ चिनी-तैपेई संघाकडून १-३ असा पराभूत झाला. तर पुरुषांचा संघावर यजमान दक्षिण कोरियाने ३-० ने मात केली. (Table Tennis News)
क्रमवारीनुसार, भारतीय संघांनी पॅरिस ऑलिम्पिकमध्ये प्रवेश केला हे जवळ जवळ निश्चित आहे. आणि ही पहिलीच वेळ आहे जेव्हा सांघित टेबलटेनिस स्पर्धेत भारतीय संघ ऑलिम्पिकमध्ये खेळेल. (Table Tennis News)
जागतिक अजिंक्यपद स्पर्धा ५ मार्चला संपली, की संघांची नवीन क्रमवारी जाहीर होईल. आणि या क्रमवारीच्या आधारे भारतीय संघाची ऑलिम्पिक पात्रता ठरेल. ‘सध्या तरी भारताच्या महिला आणि पुरुषांच्या संघाने ऑलिम्पिक पात्रतेचा अडथळा दूर केल्याचंच चिन्ह आहे. पण, आम्ही अंतिम क्रमवारीची वाट पाहू,’ असं टेबल टेनिस असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी पीटीआय वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितलं. (Table Tennis News)
A history being created ! The Indian Men’s and Women’s Table Tennis Teams have qualified for the Paris #Olympics 2024 for the first time ever! pic.twitter.com/j5XCQ5L5ra
— Kiren Rijiju (@KirenRijiju) February 22, 2024
(हेही वाचा – Sachin Tendulkar Plays Cricket in Kashmir : ‘आऊट करना पडेगा,’ म्हणत सचिनने काश्मिरी गोलंदाजांना दिलं आव्हान)
अखेर तीनही सामने भारताने गमावले
महिलांच्या सामन्यात मनिका बात्राने चेन सू यू विरुद्धचा आपला एकेरीचा सामना जिंकला. पण, तिचे साथीदार श्रीजा अकुला आणि अहिल्या मुखर्जी यांनी आपापले सामने गमावल्यामुळे भारतीय महिलांचा पराभव झाला. (Table Tennis News)
तर शरथ कमल, साथियन आणि हरमीत देसाई या पुरुषांच्या चमूला दक्षिण कोरिया विरुद्धचा सामना जडच जाणार होता. क्रमवारीत कोरियाचा संघ सध्या अव्वल आहे. आणि या स्पर्धेतही साखळीत त्यांनी भारताला आरामात हरवलं होतं. त्यामुळे आताही पुरुष संघाकडून फारशी अपेक्षा नव्हतीच. अखेर तीनही सामने भारताने गमावले. आणि भारताचे दोन्ही संघ स्पर्धेतून बाद झाले. (Table Tennis News)
पण, एकंदरीत भारतीय संघांच्या या स्पर्धेतील कामगिरीचं कौतुक होत आहे. पुरुषांच्या संघाने बलाढ्य कझाकस्तानचा पराभव करण्याची किमया केली. आणि अंतिम १६ संघात स्थान मिळवण्यातही ते यशस्वी ठरले. तर महिलांनीही अंतिम १६ संघात स्थान मिळवण्यासाठी इटलीचा ३-० ने पराभव केला होता. (Table Tennis News)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community