- ऋजुता लुकतुके
देशात सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेसाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करण्याचा मान बंगळुरू मेट्रोनं मिळवला आहे. मेट्रोच्या येलो लाईनवर रेल्वे रुळांवर लक्ष ठेवण्याचं काम कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित यंत्रणा करणार आहे. आरव्ही रोड ते बोम्मासांदरा असा हा मेट्रो मार्ग चालकरहित आहे. म्हणजे या मार्गावरील मेट्रोत चालक नसतो. ती स्ययंचलित आहे. (AI in Bengaluru Metro)
इन्फोसिस, बायोकॉन सारख्या महत्त्वाच्या कंपन्या या मार्गावर आहेत. आणि सप्टेंबर २०२४ पासून हा मार्ग सुरू होणार आहे. सकाळी मेट्रोच्या नियमित फेऱ्या सुरू होण्यापूर्वी एक मेट्रो दोन्ही बाजूने धावून सुरळीत वीज पुरवठा, मार्गातील अडथळे यांची पाहणी करते. या मेट्रोमध्ये फक्त तंत्रज्ञ आणि वीज पुरवठा केंद्राचा अधिकारी असतो. (AI in Bengaluru Metro)
🚄In a first, Bengaluru Metro will use AI to monitor tracks
By @ChristinMP_
https://t.co/cWXWSyIvUo via @moneycontrolcom— Chandra R. Srikanth (@chandrarsrikant) February 22, 2024
(हेही वाचा – Bridge : मुंबई विमानतळ ते पश्चिम द्रुतगती महामार्गाला जोडणारा उड्डाणपूल तयार पण उद्घाटनाच्या प्रतीक्षेत; नागरिकांचे हाल सुरूच)
देशात पहिल्यांदाच ही प्रणाली वापरली जाणार
दिवसाची ही पहिली फेरी प्रवाशांसाठी नसते. आणि ती मुद्दाम कमी वेगाने चालवली जाते. वाटेत सिग्नल प्रणालीवरही या मेट्रोतील लोकांचं लक्ष असतं. अशा तपासणी फेरीसाठी आता कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित यंत्रणा वापरली जाणार आहे. दोन मेट्रो गाड्यांमध्ये अशी यंत्रणा बसलली गेली आहे. आणि या मेट्रो गाड्या परस्पर विरुद्ध दिशांना धावतील. (AI in Bengaluru Metro)
या मेट्रोंना विविध ठिकाणी कॅमेरे बसवलेले आहेत. हे कॅमेरे जी छायाचित्र टिपतील ती ताबडतोब सर्व्हरला पाठवली जातील. आणि ती पाहून एआय यंत्रणा मेट्रो मार्ग प्रवासासाठी सुरक्षित आहे की नाही हे ठरवेलं. काही अडचणी दिसल्यास ही यंत्रणा धोक्याची घंटा वाजवेल. देशात पहिल्यांदाच ही प्रणाली वापरली जात आहे. बंगळुरुमध्ये ती यशस्वी झाली तर याच शहरात इतर मार्गांवरही तिचा वापर करण्यात येणार आहे. यापूर्वी रस्त्यावरील रहदारी नियंत्रित करण्यासाठीही बंगळुरू वाहतूक शाखेनं एआय टूलचा वापर केला आहे. (AI in Bengaluru Metro)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community