- ऋजुता लुकतुके
बीसीसीआयचे (BCCI) सचिव जय शाह यांनी अलीकडेच बोर्डाबरोबर मध्यवर्ती करार असलेल्या खेळाडूंनी वेळ असेल तेव्हा रणजी सामने खेळणं अनिवार्य करण्याचं सुतोवाच केलं आहे. तेव्हा त्यांचा निशाणा झारखंडचा खेळाडू इशान किशनवर होता. डिसेंबर २०२३ पासून मानसिक थकव्याचं कारण देत इशान एकही सामना खेळला नाहीए. आणि आता तो आयपीएलसाठी सराव करतोय. पण, मध्ये झालेल्या रणजी सामन्यांना त्याने दांडी मारली होती. बीसीसीआयने (BCCI) त्याला वेळोवेळी रणजी सामने खेळण्यासाठी तंबी दिली आहे. पण, एकतर तो काहीतरी कारणं देत रणजी खेळणं टाळतोच आहे. शेवटच्या साखळी सामन्यापूर्वी तर त्याने बीसीसीआयला, ‘तंत्र सुधारण्याची’ सबब दिली होती. (Making Ranji Compulsory?)
त्यामुळे इशान तर खेळलाच नाही. आणि त्याचवेळी श्रेयस अय्यर, हार्दिक पांड्या, कृणाल पांड्या हे खेळाडूही सराव करतायत पण, रणजी सामना खेळणार नाहीएत. त्यामुळे बीसीसीआयचं (BCCI) रणजी अनिवार्य करण्याचं धोरण नेमकं काय आहे, असा प्रश्न आता विचारला जात आहे. ‘नखरे नही चलेंगे. मध्यवर्ती करार झालेल्या खेळाडूंना मी फोनवर आधीच सांगितलंय. आता त्यांना ईमेल करण्यात येणार आहे. जर कर्णधार आणि मुख्य प्रशिक्षकांनी त्यांना रणजी क्रिकेट खेळायचा सल्ला दिला असेल तर त्यांनी खेळलंच पाहिजे. मी हे फक्त इशान किशनबद्दल बोलत नाहीए. तर सगळ्यांनाच हा नियम लागू आहे,’ असं जय शाह पत्रकारांशी बोलताना म्हणाले होते. (Making Ranji Compulsory?)
पण, प्रत्यक्षात खेळाडूंना खेळण्याची सक्ती होताना दिसत नाहीए. श्रेयस अय्यरने मुंबईच्या बडोद्या विरुद्धच्या उपउपांत्य सामन्यातून माघार घेतली आहे. पण, राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचा अहवाल बघितला तर श्रेयसला कुठलीही नवीन दुखापत झालेली नाही. असं असताना श्रेयसला न खेळण्याची परवानगी मिळालीच कशी असा सवाल विचारला जात आहे. भारताच्या एका माजी खेळाडूने तर आपलं मत उघडपणे ट्विटरवर व्यक्त केलं आहे. (Making Ranji Compulsory?)
Is there a different rules for different players for not playing Indian first class cricket in the name of looking after the body?
— Irfan Pathan (@IrfanPathan) February 22, 2024
(हेही वाचा – Coastal Road Project : कोस्टल रोडच्या अर्धवट प्रकल्पाचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी करतील?)
निशाणा श्रेयस अय्यरवर
‘आम्ही आमच्या शरीराची काळजी घेत आहोत, या सबबीखाली काही खेळाडू रणजी सामने खेळत नाहीएत. मग प्रत्येक खेळाडूसाठी वेगवेगळा नियम आहे की काय?’ असा सवालच इरफान पठाणने विचारला आहे. त्याने खेळाडूचं नाव लिहिलेलं नाही. पण, त्याचा निशाणा श्रेयस अय्यरवर असू शकतो. (Making Ranji Compulsory?)
दुसरं म्हणजे दुखापतीतून सावरत असलेले हार्दिक पांड्या आणि कृणाल पांड्याही बडोद्याकडून खेळत नाहीएत. पण, मुंबई इंडियन्स या फ्रँचाईजीच्या मालकीच्या मैदानात ते सराव करताना दिसले आहेत. म्हणजेच खेळाडू कसोटी क्रिकेटला दांडी मारून आगामी आयपीएलसाठी (IPL) स्वत:ला तंदुरुस्त ठेवण्याच्या प्रयत्नांत आहेत. आणि हे चुकीचं की बरोबर हे सध्या बीसीसीआयलाच ठरवता येत नाहीए. (Making Ranji Compulsory?)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community