संघटनात्मक तत्वे (Principles Of Organization) हे केवळ संघटनासाठीच नव्हे तर दैनंदिन जीवनातही उपयोगी पडतात. कारण जबाबदारी, समन्वय, उद्देश, नियंत्रण इत्यादी गुण जीवनात आवश्यक असतात आणि या गुणांच्या बळावर कोणत्याही प्रकारचे संघटन घडवता येते, तसेच दैनंदिन जीवनाला आकारही देता येतो. (Principles Of Organization)
आपल्या दैनंदिन आयुष्यात संघटनात्मक तत्वे कसे लागू कराल?
आज आपण इथे संघटनाच्या काही महत्वाच्या तत्वांबद्दल (Principles Of Organization) चर्चा करणार आहोत. काही संघटनात्मक तत्वे आहेत, ज्यांचा उपयोग करुन तुम्ही नक्कीच चांगले आयुष्य घडवू शकता. सर्वात आधी संघटन का महत्वाचे आहे हे जाणून घेतले पाहिजे. पूर्वी एक जाहिरात लागायची. त्यात एक पैलवान व्यक्ती एखादी जाड काठी सहज तोडायचा. मग त्यात एकेक करुन काही काठ्या समाविष्ट करण्यात आल्या, तेव्हा त्या संघटित काठ्या त्याला तोडता नाही आल्या. याचा अर्थ संस्था म्हणून किंवा संघटन म्हणून काम केल्याने काम अधिक पक्क आणि दीर्घकाळ टिकणारं होतं. (Principles Of Organization)
रचनात्मक कार्य करण्यासाठी संघटन महत्वाचे असते. त्यासाठी नेतृत्व देखील गरजेचे असते. अनेक नेते प्रसिद्ध झाले कारण त्यांचं संघटनात्मक कार्य उत्तम होतं. आपण असे म्हणतो की अमूक अमूक नेत्याने विजय मिळवला, त्याने युद्ध जिंकले. पण युद्ध काय एक व्यक्ती लढत नसते. सैन्य लढत असतं. ते सैन्य म्हणजे संघटनात्मक शक्ती. पण नेतृत्व नसेल तर सैन्य किंवा संघटन डळमळीत होतं. म्हणून रचनात्मक कार्यासाठी कुणीतरी नेतृत्व घ्यायला हवे आणि इतरांनी त्याचे नेतृत्व मान्य करायला हवे. कर्तव्य भावना हा संघटनाचा पाया आहे. तुम्हाला दिलेले कार्य तुम्हाला पार पाडता आले पाहिजे आणि ते कार्य नसून कर्तव्य आहे ही भावना रुजली पाहिजे. तसेच वेगवेगळे विभाग पाडता आले पाहिजे. विभाग म्हणजे डिपार्टमेंट. या विभागापुरते प्रत्येकाचे कर्तव्य ठरवून देता आले पाहिजेत. महत्वाचे म्हणजे तुमचे प्रशासन चांगले असले पाहिजे. त्याच लवचिकता असली पाहिजे. (Principles Of Organization)
(हेही वाचा – T Raja Singh : मीरा भाईंदरमध्ये धडाडणार टी राजा सिंह यांची तोफ; उच्च न्यायालयाने दिली कार्यक्रमाला परवानगी)
निर्णयक्षमता हा देखील एक महत्वाचा संघटनात्मक गुण आहे. कधी कोणता निर्णय घ्यायचा हे कळलं पाहिजे. योग्य निर्णय घेणे हे महत्वाचे आहेच, त्याचबरोबर निर्णय घेणे म्हणजेच निर्णय न टाळणे हे देखील महत्वाचे आहे. कधी कधी असा पेच उत्पन्न होऊ शकतो की निर्णय घ्यावा की घेऊ नये. अशा वेळी निर्णय घेणे आणि तो योग्य असणे हे देखील महत्वाचे आहे. हे वरील गुण जर तुमच्यात असतील तर तुम्ही चांगले संघटन उभे करु शकता, किंवा उभे राहिलेले संघटन चालवू शकता आणि त्याचबरोबर दैनंदिन आयुष्यातही सुधारणा घडवून आणू शकता. हे गुण एखाद्या गृहिणीकडे देखील असायला हवे, कुटुंब प्रमुखाकडे देखील असायला हवे. कारण कुटुंब हे देखील एक संघटन आहे ना.. (Principles Of Organization)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community