Lok Sabha Elections : मुंबईत भाजप विरुद्ध शिवसेना उबाठा सामना?

Congress, Shiv Sena ला प्रत्येकी एक-एक जागा..

245
Lok Sabha Elections : मुंबईत भाजप विरुद्ध शिवसेना उबाठा सामना?

मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी तर देशाची आर्थिक राजधानी. यामुळे मुंबईकडे सगळ्यांचेच विशेष लक्ष आहे. लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले असतानाच आता महायुतीमधील (Mahayuti) भाजप (BJP) आणि महाविकास आघाडीतील (Mahavikas Aghadi) शिवसेना उबाठा (Shiv Sena UBT) या दोघांनी मुंबईतील सहा लोकसभा (Lok Sabha) जागांपैकी पाच-पाच जागांवर दावा केल्याने मुंबईत भाजप (BJP) विरुद्ध उबाठा (UBT) असा सामना रंगण्याची शक्यता निर्माण झाली आहे. (Lok Sabha Elections)

शरद पवारांच्या पक्षाचे मुंबईत शून्य उमेदवार

महाविकास आघाडीतील उबाठाने मुंबईतील सहा लोकसभा मतदार संघांपैकी दक्षिण मुंबई, दक्षिण-मध्य मुंबई, उत्तर-पश्चिम मुंबई, ईशान्य मुंबई आणि उत्तर मुंबई या पाच जागांवर दावा केल्याचे समजते तर केवळ उत्तर-मध्य मुंबई काँग्रेससाठी सोडण्याची तयारी दर्शवली. काँग्रेसने उत्तर-पश्चिमसाठी काही प्रयत्न न केल्याने या मतदार संघातून निवडणूक लढण्यास इच्छुक असलेले काँग्रेस नेते संजय निरुपम नाराज आहेत. यामुळे निरुपम यांनी पुढील काळात काँग्रेस सोडण्याचा निर्णय घेतला तर आश्चर्य वाटाणार नाही, अशी चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार (Pawar) पक्षाचे मुंबईत अस्तित्व संपल्याने त्या पक्षाने मुंबईत एकाही जागेचा आग्रह धरला नाही. (Lok Sabha Elections)

महायुतीतही आलबेल नाही

महायुतीतदेखील सर्व काही आलबेल आहे असे चित्र नाही. भाजपदेखील (BJP) मुंबईतील पाच जागांसाठी आग्रही असल्याचे कळते. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला फक्त विद्यमान खासदार राहुल शेवाळे (Rahul Shewale) हे प्रतिनिधित्व करत असलेल्या दक्षिण-मध्य मुंबई मतदार संघावर समाधान मानावे लागणार, असे दिसते आहे. (Lok Sabha Elections)

(हेही वाचा – T Raja Singh : मीरा भाईंदरमध्ये धडाडणार टी राजा सिंह यांची तोफ; उच्च न्यायालयाने दिली कार्यक्रमाला परवानगी)

कीर्तिकर नाराज

एकीकडे उत्तर-पश्चिम मतदार संघाचे खासदार गजानन कीर्तिकर यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडून शिंदे यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला आणि आता लोकसभा लढवण्याची संधी मिळणार नाही, या भीतीने त्यांची अस्वस्थता वाढली असल्याचे समजते. भाजपचे (UBT) राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांनी नुकताच दोन दिवसीय मुंबई दौरा केला. त्यानंतर भाजपकडून पाच जागांवर दावा करण्यात येणार आल्याचे कळते. महायुतीतील अजित पवार (Pawar) यांच्या राष्ट्रवादी पक्षानेदेखील वाव नसल्याने, मुंबईतील एकाही लोकसभा जागेवर दावा संगीतला नसल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. (Lok Sabha Elections)

ठाकरेंना मुंबईतच अडकवणार

परिणामी मुंबईत भाजपविरुद्ध (BJP) शिवसेना उबाठा (UBT) अशी लढत होणाची शक्यता असून उद्धव ठाकरे यांना मुंबईतच अडकवून, उर्वरित महाराष्ट्रात प्रचारासाठी फिरू न देण्याचा, ‘प्लान’ असल्याचे सांगण्यात आले. (Lok Sabha Elections)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.