महाराष्ट्र नवनिर्माण सेना (Maharashtra Navnirman Sena) आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सक्रीय होत असल्याचे दिसत आहे. मनसेच्या वतीने शुक्रवारी पुण्यात धडक मोर्चा काढण्यात आला. लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. सर्वच राजकीय पक्षांनी लोकसभेची (Lok Sabha) तयारी सुरू केली आहे. मनसेने पुणे जिल्ह्याची जबाबदारी राज ठाकरे (Raj Thackeray) यांचे पुत्र अमित ठाकरे (Amit Thackeray) यांच्यावर दिली आहे. राज ठाकरे आतापर्यंत स्वत: निवडणूक रिंगणात उतरले नाहीत, पण अमित ठाकरे निवडणुकीच्या मैदानात उतरणार का? या प्रश्नाचे उत्तर अमित ठाकरे यांनी दिले आहे.
शुक्रवारी मनसेच्या वतीने पुण्यात धडक मोर्चा काढण्यात आला. विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यांकरिता हा मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी मनसेकडून मोठ्या प्रमाणात शक्ती प्रदर्शनही करण्यात आले होते. त्यामुळे आता अमित ठाकरे निवडणुकीच्या रिंगणात उतरणार का? असा सवाल उपस्थित झाला आहे.
(हेही वाचा – Maratha Reservation: राज्यभरात आंदोलनाची घोषणा, मनोज जरांगेंना हायकोर्टाची नोटीस )
अमित ठाकरे म्हणाले की, राज साहेबांनी जबाबदारी दिली तर मी ते म्हणतील ती जबाबदारी घ्यायला तयार आहे. त्यांनी म्हटले तर लोकसभा लढवेन, विधानसभा लढवेन, नगरसेवक पण होईन. सरपंचही होईन. पुण्यातून लोकसभा लढवणार आहे. पण माझी स्वत:ची निवडणूक लढवण्याची इच्छा नाही.
पुण्यात माध्यमांशी बोलताना अमित ठाकरे म्हणाले की, मी राजकारणात आल्यापासून पहिल्या राजकीय केसची वाट पहातोय. ती संधी पुणे विद्यापीठाने देऊ नये. मी त्यांना ८ दिवसांचा वेळ दिला आहे. त्या वेळेत त्यांनी कारवाई केली नाही. तर आम्ही आमच्या स्टाईलने आंदोलन करू.
पुणे विद्यापीठाच्या मेसमध्ये झुरळ
अमित ठाकरे म्हणाले, प्रत्येक विद्यापीठात मनविसेचे युनिट हवे आहे. विद्यापीठाच्या स्थापनेपासून आपणास मेसमध्ये चांगले जेवण मिळत नाही, त्यासाठी वेळोवेळी भांडण केले आहे. ही शोकांतिका आहे. काल विद्यापीठाच्या कॅन्टीनमध्ये पोह्यात झुरळ मिळाले. त्याचे फोटो अमित ठाकरे यांनी दाखवला. वॅाशरुम आणि होस्टेलचे फोटो दाखवले.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community