Humanitarian Crisis In Afghanistan : तालिबानींच्या पुनरागमनामुळे अफगाणिस्तानात मानवतावादी संकट निर्माण, हिंदुस्थानमध्ये बेकायदेशीर वास्तव्य

हिंदुस्थानने "ई-इमर्जन्सी एक्स-मिस्क" हा इलेक्ट्रॉनिक व्हिसा सुरू केला तसेच त्यांना सुरक्षित निवारा देण्याचे मान्य केले आहे.

156
Humanitarian Crisis In Afghanistan: तालिबानींच्या पुनरागमनामुळे अफगाणिस्तानात मानवतावादी संकट निर्माण, हिंदुस्थानमध्ये बेकायदेशीर वास्तव्य
Humanitarian Crisis In Afghanistan: तालिबानींच्या पुनरागमनामुळे अफगाणिस्तानात मानवतावादी संकट निर्माण, हिंदुस्थानमध्ये बेकायदेशीर वास्तव्य

अफगाण सरकारचे पतन आणि तालिबानींच्या सत्तेत झालेल्या पुनरागमनामुळे अफगाणिस्तानात मानवतावादी संकट निर्माण झाले आहे. अनेक अफगाण नागरिकांनी त्यांची सुरक्षितता धोक्यात आल्यामुळे देश सोडला. अफगाणी नागरिक हिंदुस्थानमध्ये बेकायदेशीरपणे वास्तव्य करीत आहेत. (Humanitarian Crisis In Afghanistan)

जहीर खान या बोगस नावाने मुंबईतील वडाळा येथे बेकायदेशीर वास्तव्य करणाऱ्या अफगाणी नागरिकाचे खरे नाव हबीबुल्ला प्रांग (३४)असे आहे. अफगाणिस्तानमधील जिल्हा झुरामत, पक्तिया प्रांत येथील मूळचा असणारा हबीबुल्ला उर्फ जहिर याच्याविरुद्ध बोगस कागदपत्रे तयार करणे व बेकायदेशीररित्या वास्तव्य केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हबीबुल्ला उर्फ जहिरच्या अटकेनंतर मुंबईत बेकायदेशीर राहणाऱ्या अफगाणी नागरिकांची माहिती समोर येईल, अशी शक्यता पोलिसांकडून वर्तवली जात आहे.

हिंदुस्थानमध्ये राहणाऱ्या अफगाणी नागरिकांमुळे हिंदुस्थानला धोका आहे का? असा प्रश्न निर्माण झाला आहे. जहिर उर्फ हबीबुल्ला हा हिंदुस्थानात २००७मध्ये आला होता, त्यानंतर तो पुन्हा अफगाणला परतला आणि पुन्हा हिंदुस्थानमध्ये येऊन त्याने आपली ओळख लपविण्यासाठी जहिर खान नावाने हिंदुस्थानी असल्याची बोगस कागदपत्रे तयार केली होती. हबीबुल्ला हा स्वतःची ओळख लपवून मुंबईत का राहत होता, यामागे त्याचा उद्देश काय असू शकतो, याबाबत गुन्हे शाखेकडून तपास सुरू आहे.

(हेही वाचा – Ghar Wapsi : केरळमध्ये ९२ ख्रिस्त्यांची घरवापसी; ३०० कुटुंबे शुद्धीकरणाच्या प्रतीक्षेत )

अफगाण नागरिक हिंदुस्थानमध्ये निर्वासित म्हणून राहू शकतो…
अफगाणमध्ये तालिबानी राजवट लागू झाल्यानंतर काही देशांनी अफगाणिस्तानातून निर्वासितांना घेण्याचे मान्य केले आहे. हिंदुस्थानने “ई-इमर्जन्सी एक्स-मिस्क” हा इलेक्ट्रॉनिक व्हिसा सुरू केला तसेच त्यांना सुरक्षित निवारा देण्याचे मान्य केले आहे. भारतात येऊ इच्छिणाऱ्या अफगाण नागरिकांसाठी ऑगस्ट २०२१ मध्ये नवीन व्हिसा सुरू झाल्यापासून, हिंदुस्थानला अफगाण नागरिकांकडून जवळपास ६० हजार अर्ज प्राप्त झाले. सुरक्षा मंजुरी पूर्ण झाल्यानंतर व्हिसावर प्रक्रिया केली जाईल. ६ महिन्यांसाठी हा व्हिसा वैध असेल. युनायटेड नेशन्स हाय कमिश्नर फॉर रिफ्युजी (UNHCR)च्या जानेवारी २०२० च्या आकडेवारीनुसार, हिंदुस्थानमध्ये निर्वासित नागरिकांमध्ये अफगाण देशातील नागरिक हे चौथ्या क्रमांकावर आहेत. हिंदुस्थानमध्ये जवळपास २ लाख निर्वासित आहेत. ज्यांना भारताकडून मदत आणि संरक्षण मिळते. यातील बहुतांश निर्वासित तिबेटचे आहेत. त्यानंतर श्रीलंका, म्यानमार आणि अफगाणिस्तानच्या नागरिकांचा क्रमांक लागतो.

…त्यांना अटक करून तुरूंगात डांबले जाते!
धार्मिक समस्यांमुळे अफगाण सोडून हिंदुस्थानमध्ये येणाऱ्यांचे स्वागत करून त्यांना निर्वासित केले जाते. त्यांना रिफ्युजी कॅम्पमध्ये ठेवले जाते जाते, परंतु जे गुन्हेगारी कृत्य करण्याच्या हेतूने हिंदुस्थानमध्ये येऊन बेकायदेशीर वास्तव्य करतात, त्यांना अटक करून तुरुंगात डांबले जाते, न्यायालयात त्यांना सिद्ध करावे लागते की, अफगाणमध्ये ते असुरक्षित होते, त्यानंतर न्यायालय त्यांना निर्वासित म्हणून घोषित करून त्यांची रवानगी रिफ्युजी कॅम्पमध्ये करते, असे महाराष्ट्र राज्याचे माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांनी म्हटले आहे.

निर्वासित कार्ड जारी
यासंदर्भात प्रवीण दीक्षित म्हणाले की, अफगाणिस्तानसारखे देश शेजारी देशांतील निर्वासित स्थिती निश्चित करण्यासाठी ‘संयुक्त राष्ट्रे निर्वासित उच्चायुक्त’ (UNHCR)कार्यालयाशी संपर्क साधतात. त्यानंतर त्यांना निर्वासित कार्ड जारी केले जाते. ते मूलभूत सेवा उदा. शिक्षण, आरोग्यसेवा, परवडणारी घरे आणि औपचारिक रोजगार मिळवू शकत नाहीत. या कार्डाच्या आधारे सरकार निर्वासितांना निवासी परवाने देऊ शकते अशी माहिती माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांनी ‘हिंदुस्थान पोस्ट’शी बोलताना दिली.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.