विशेष प्रतिनिधी,मुंबई
मागील काही महिन्यांपासून माहीम, दादर आणि धारावीकरांना ज्याचा त्रास होत होता, त्याचा बंदोबस्त करण्यात आला आहे. अनेक वाडया, हाऊस गल्ली,पदपथ तसेच वस्त्या आदी ठिकाणी उंदरांचा सुळसुळात सुरु असल्याने मागील काही महिन्यांपासून जनता त्रस्त होती. परंतु महापालिकेच्या जी उत्तर विभागातील किटक नाशक विभागातील कामगारांसह इतर कामगारांच्या मदतीने राबवलेल्या विशेष मोहिमेमध्ये एकाच दिवसांमध्ये तब्बल २०८० उंदरांना (Rat Killer) मारण्यात आले. संपूर्ण मुंबईत एकाच दिवसांत १२०० ते १५०० उंदरांना मारण्यात येते. परंतु संपूर्ण मुंबईत जेवढे उंदिर मारले जाते, त्यापेक्षा अधिक उंदिर एकाच वॉर्डात अर्थात जी उत्तर विभागातील माहीम, दादर आणि धारावी भागांमध्ये मारले गेले आहे. त्यामुळे मारल्या गेलेल्या सर्व उंदरांची विल्हेवाट ही देवनार येथील डम्पिंग ग्राऊंडवर खड्डयात करण्यात आली आहे. (Rat Killer)
उंदरांचा उपद्रव कमी करण्यासाठी विशेष मोहिम
मुंबई महापालिकेच्या सार्वजनिक आरोग्य खात्याच्या अखत्यारित येणाऱ्या किटक नाशक विभागातील कामगारांच्या माध्यमातून उदरांचा उपद्रव कमी करण्यासाठी विशेष मोहिम राबवली जात आहे. त्यानुसार प्रत्येक विभागांमध्ये एक दिवस विशेष मोहिम राबवली जात असून २४ फेब्रुवारी २०२३ मध्ये पहिली मोहिम राबवली. त्यामुळे एकाच दिवशी ९६५ उंदिर मारले गेले आहे. तर त्यानंतर ४ मे २०२३मध्ये राबवलेल्या मोहिमेमध्ये १०६६ उंदिर मारले गेले आणि त्यानंतर २५ ऑक्टोबर २०२३ रोजीच्या मोहिमेमध्ये १५३९ उंदिर मारले गेले होते. त्यानंतर २२ फेब्रुवारी २०२४ रोजी जी उत्तर विभागांमध्ये ही मोहिम राबवली गेली. (Rat Killer)
एकाच दिवशी एकाच वॉर्डातून २०८० उंदिर मारले
जी उत्तर विभागातील माहीम (mahim) , दादर (dadar) आणि धारावीमध्ये (dharavi) उंदरांचा वाढता सुळसुळाट आणि जनतेला होणारा त्रास लक्षात घेता या विभागातील किटक नाशक विभागातील कामगारांसह इतर विभागातील ४५ कामगारांनी आणि १३ पर्यवेक्षकांनी तब्बल ५५ किलो गव्हाचा पिठाचा वापर करून या पिठाच्या गोळ्यातून उंदरांना मारण्यसाठी विषबाधेचा प्रयोग केला. त्यामध्ये तब्बल २०८० उंदरांवर विषाचा प्रयोग झाला आणि (Rat Killer) ते मृत पावले. त्यामुळे एकाच दिवशी एकाच वॉर्डातून २०८० उंदिर मारण्याचा एकप्रकारे रेकॉर्ड नोंदवला गेला.
(हेही वाचा – Hydropower Projects : जलविद्युत प्रकल्प कामांतील अनियमितता : सीबीआयच्या मुंबईसह देशांत 30 हून अधिक ठिकाणांची झडती)
दिवसाला संपूर्ण मुंबईतून १२००त १५०० उंदरांना मारले जाते
मुंबईत पिंजरे लावून उंदरांना पकडणे (rat cachers), विषाचा (poison) प्रयोग करून मारणे तसेच विविध संस्थांच्या माध्यमातून उंदरांना पकडणे असे प्रयोग सुरु असतात. त्यामुळे दिवसाला संपूर्ण मुंबईतून १२००त १५०० उंदरांना पकडले जातात किंबहुना मारले जातात. परंतु संपूर्ण मुंबईतून जेवढे उंदिर एका दिवसाला मारले जात नाही, त्याहून अधिक उंदिर हे जी उत्तर या एका विभागात मारले गेले आहे. त्यामुळे आजवर राबवलेल्या विशेष मोहिमेत मारल्या जाणाऱ्या उंदरांच्या संख्येच्या तुलनेत २२ फेब्रुवारी २०२४ मध्ये मारल्या गेलेल्या उंदरांच्या संख्येने रेकॉर्ड ब्रेक केल्याचे किटक नाशक विभागाच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
देवनार डम्पिंग ग्राऊंडवर लावली जाते विल्हेवाट
महापालिकेच्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार संपूर्ण मुंबईत मारले गेलेले उंदिर हे जी दक्षिण येथील एका ठिकाणी जमा केले जातात आणि तिथून देवनार येथे महापालिका घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या वाहनांमधून नेले जातात. तिथे मग खड्डा खणून या सर्व उंदरांची विल्हेवाट लावली जाते. यापूर्वी पकडलेले उंदिर हे हाफकिन संस्थेला दिले जायचे,परंतु आता हे बंद झाल्याने यासर्व उंदरांची विल्हेवाट देवनार येथील डम्पिंग ग्राऊंडवर लावली जाते असे किटक नाशक विभागच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community