गायत्री चक्रवर्ती यांचा जन्म २४ फेब्रुवारी १९४२ रोजी कलकत्ता येथे परेस चंद्र आणि सिविनी चक्रवर्ती यांच्या घरी झाला. त्यांनी १९५९ मध्ये कोलकोताच्या प्रेसिडेन्सी कॉलेजमधून इंग्रजीत बॅचलर पदवी मिळवली व इंग्रजी आणि बंगाली साहित्यात सुवर्णपदक देखील पटकावले. तसेच त्यांनी कॉर्नेल विद्यापीठातून इंग्रजीमध्ये एम.ए. ची पदवी पाप्त केली व त्यानंतर तुलनात्मक साहित्यात पीएच.डी.ची मिळवली. (Gayatri Chakraborty Spivak)
(हेही वाचा – Sewing Machin : शिवण यंत्रांचे दर झाले कमी, पण घरघंटीची रक्कम तेवढीच)
कोलंबिया विद्यापीठाच्या प्राध्यापिका
कॉर्नेल विद्यापीठात त्यांनी विल्यम बटलर येट्सवरील “मायसेल्फ मस्ट रिमेक: द लाइफ अँड पोएट्री ऑफ डब्ल्यू.बी. येट्स” या नावाचा शोध-निबंध सादर केला होता. याचे दिग्दर्शन पॉल डी मॅन यांनी केले होते. २१ डिसेंबर २०१४ रोजी कोलकोता येथील प्रेसिडेन्सी कॉलेज द्वारे त्यांना ‘ऑनररी डी. लिट’प्रदान करण्यात आले. गायत्री चक्रवर्ती स्पिवाक ह्या भारतीय साहित्यिक सिद्धांतकार, तत्त्वज्ञ आणि कोलंबिया विद्यापीठाच्या प्राध्यापिका आहेत.
ओबरलिन कोलेजमधून मानद डॉक्टरेट
तसेच तिथे त्या इन्स्टिट्यूट फॉर कॉम्पॅरेटिव्ह लिटरेचर अँड सोसायटीच्या संस्थापक सदस्य आहेत. २०१२ मध्ये त्यांना कला आणि तत्त्वज्ञानासाठी क्योटो पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. २०१३ मध्ये त्यांना पद्मविभूषण पुरस्कार प्रदान करुन भारत सरकारने त्यांचा सन्मान केला. त्या Guggenheim fellow असून त्यांना ओबरलिन कोलेजमधून मानद डॉक्टरेट मिळाले आहे तसेच अनेक शैक्षणिक सन्मानही मिळाले आहेत. २००७ मध्ये तिची अमेरिकन फिलॉसॉफिकल सोसायटीमध्ये निवड झाली. (Gayatri Chakraborty Spivak)
हेही पहा –