Steve Jobs : नाम तो सुना ही होगा! असे घडले ऍपल कंपनीचे सीईओ…

२०११ मध्ये त्यांनी सीईओ पदाचा राजीनामा दिला पण ते मंडळाचे अध्यक्ष या पदावर काम करु लागले. २००३ मध्ये त्यांना स्वादुपिंडाचा कर्करोग झाला.

211
Steve Jobs : नाम तो सुना ही होगा! असे घडले ऍपल कंपनीचे सीईओ...
Steve Jobs : नाम तो सुना ही होगा! असे घडले ऍपल कंपनीचे सीईओ...

स्टीव्ह जॉब (Steve Jobs) हे संगणक, लॅपटॉप आणि मोबाईल फोन्स बनवणाऱ्या ॲपल या कंपनीचे माजी सीईओ आणि प्रसिद्ध अमेरिकन उद्योगपती आहेत. जीवनात अतिशय संघर्ष करून या स्थानावर ते पोहोचले होते. सॅन फ्रान्सिस्को, कॅलिफोर्निया येथे जन्मलेले स्टीव्ह हे दत्तक पुत्र होते. त्यांचं शिक्षण कॅलिफोर्नियामध्ये झाले. त्यावेळी त्यांच्याकडे फारसे पैसे नव्हते. त्यामुळे उन्हाळ्याच्या सुट्टीत काम करायचे.

१९७२ मध्ये, जॉब्स यांनी पोर्टलँडमधील रीड कॉलेजमधून पदवी प्राप्त केली. कॉलेजच्या जीवनात ते त्यांच्या मित्राच्या खोलीत राहायचे आणि जमिनीवरच झोपायचे. पोट भरण्यासाठी त्यांनी कोकच्या बाटल्या विकल्या. तसेच कृष्ण मंदिरात आठवड्यातून एकदा मोफत जेवण मिळायचे. पैसे नसल्यामुळे त्यांना मंदिरात जेवायला लागायचे.

त्यानंतर प्रचंड कष्ट आणि चांगल्या सवयींच्या आधारावर त्यांची एकूण संपत्ती अंदाजे $५.१ अब्ज झाली होती. विशेष म्हणजे ते अमेरिकेतील सर्वात श्रीमंत व्यक्तिंमध्ये ४३ व्या स्थानावर होते. १९७३ मध्ये जॉब्स यांनी अटारी येथे तंत्रज्ञ म्हणून काम केले.

१९७४ मध्ये आध्यात्मिक ज्ञानाच्या शोधात ते करोली बाबांना भेटण्यासाठी आपल्या मित्रांससोबत भारतात आले. पण जेव्हा ते करोली बाबांच्या आश्रमात पोहोचले तेव्हा त्यांचे धन झाल्याचे समजले. त्यानंतर त्यांनी हैडखन बाबांना भेटण्याचे निश्चित केले. यानिमित्ताने त्यांनी बराच वेळ दिल्ली, उत्तर प्रदेश आणि हिमाचल प्रदेशमध्ये घालवला. भारतात सात महिने राहिल्यानंतर ते पुन्हा अमेरिकेला गेले.

(हेही वाचा – Ghazwa-e-Hind : भारताच्या इस्लामीकरणाची चिथावणी; सौदी अरेबियाच्या प्रिन्सचे विधान चर्चेत)

त्यानंतर ते भारतीय कपड्यांमध्ये आणि भारतीय पद्धतीचं जीवन जगू लागले. जैन आणि बौद्ध धर्माने ते प्रभावित झाले होते. १९७६ मध्ये त्यांनी “ऍपल कॉम्प्युटर कंपनी” स्थापन केली. त्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिलं नाही. अनेक अडचणींवर मात करुन ऍपल ही जगातली मोठी कंपनी झाली. १९९६ मध्ये जेव्हा ऍपलच्या मार्केटची स्थिती बिघडली तेव्हा स्टीव्ह त्यांनी ऍपलला NeXT कॉम्प्युटर ही तयंनीच स्थापन केलेली कंपनी विकली आणि ऍपलचे मुख्य कार्यकारी अधिकारी बनले. १९९७ पासून, त्यांनी कंपनीचे सीईओ म्हणून काम केले.

२००१ मध्ये Apple ने iPod तयार केला. त्यानंतर २००१ मध्ये आय ट्यून्स स्टोअर तयार करण्यात आले. २००७ मध्ये Apple ने iPhone नावाचा मोबाईल बनवला, हा मोबाईल खूपच चालला. २०१० मध्ये ऍपलने आयपॅड नावाचा टॅबलेट संगणक तयार केला. २०११ मध्ये त्यांनी सीईओ पदाचा राजीनामा दिला पण ते मंडळाचे अध्यक्ष या पदावर काम करु लागले. २००३ मध्ये त्यांना स्वादुपिंडाचा कर्करोग झाला. ५ ऑक्टोबर २०११ रोजी पहाटे 3 च्या सुमारास कॅलिफोर्नियातील पालो अल्टो येथे राहत्या घरी त्यांचे निधन झाले.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.