Chhatrapati Shivaji Maharaj : छत्रपती शिवाजी महाराजांकडे अवघे १२ मुसलमान सैनिक होते; शिवचरित्रकार मेहेंदळे यांची पुरोगाम्यांना सणसणीत चपराक

दररोज नवनवीन खोटे सांगायचे, आधाराशिवाय सांगायचे, असे सातत्याने सुरू आहे. त्याचे उत्तर दिले पाहिजे, म्हणून मी लिहितो, असे शिवचरित्रकार गजानन मेहेंदळे म्हणाले

844

छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) हे हिंदवी स्वराज्य संस्थापक आहेत. त्यांनी मुसलमान आक्रमककर्त्यांचा मराठा मावळ्यांच्या साहाय्याने सामना केला आणि मराठा साम्राज्य उभे केले. दिल्लीचे तख्त हलवले. प्रौढ़ प्रताप पुरंदर, गौ-ब्राह्मण प्रतिपालक, क्षत्रिय कुलावतंस…असा महाराजांचा उल्लेख होवू लागला. मात्र काही तथाकथित पुरोगामी मंडळी, ब्रिगेडी हे मुद्दाम शिवरायांना पुरोगामी ठरवण्याचा खटाटोप करतात. त्यासाठी चक्क खोटा इतिहास लिहितात. विशेष म्हणजे यात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सैन्यात मोठ्या संख्येने मुसलमान सैनिक होते, असा दावा करतात. हा दावा शिवचरित्रकार गजानन मेहेंदळे यांनी खोडून टाकत पुरोगाम्यांना सणसणीत चपराक मारली आहे.

छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांच्या पूर्ण कार्यकाळात त्यांच्या पदरी केवळ १२ मुसलमान सैनिक होते. सत्य इतिहास समोर न आणता आपल्या सोयीनुसार बदल करून इतिहास मांडण्यात येत आहे, असे ‘छत्रपती शिवाजी महाराज झाले नसते तर’ या पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमात बोलताना शिवचरित्रकार गजानन मेहेंदळे म्हणाले.

काय म्हणाले गजानन मेहेंदळे? 

छत्रपती शिवाय महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांच्या सैन्यात हिंदू, मुसलमान आणि ख्रिस्ती सेवकांची यादी म्हणून एक ६० पानांचे परिशिष्ट आपण लिहिले आहे. त्यात मी प्रत्येक नावाचा साधार उल्लेख केला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे ४३६ हिंदू सेवक होते. सैैन्यात केवळ १२ मुसलमान सेवक होते. त्यापैैकी ५ जण केवळ १६५७ पर्यंतच सैैन्यात होते. हे प्रमाण ३ टक्क्यांहून कमी आहे. वस्तुस्थितीचा, संदर्भांचा अभ्यास न करता अव्वाच्या सवा प्रमाण सांगितले जाते, ते खोटे आहे. दररोज नवनवीन खोटे सांगायचे, आधाराशिवाय सांगायचे, असे सातत्याने सुरू आहे. त्याचे उत्तर दिले पाहिजे, म्हणून मी लिहितो. खोटे बोलणे फार सोपे असते. महाराजांच्या सैन्यात ७० टक्के मुसलमान होते, हे सांगायला लोकांना एक वाक्य पुरले. ते चुकीचे आहे, हे सांगायला मला ६० पानांचे परिशिष्ट लिहावे लागते, याद्या द्याव्या लागल्या. प्रत्येक खोटेपणाचा सतत प्रतिकार करत राहणे शक्य नसते. खरे सांगत राहणे, एवढेच आपण करू शकतो, असे मेहेंदळे यांनी सांगितले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.