Ind vs Eng 4th Test : रविचंद्रन अश्विनच्या नावावर ‘हा’ अनोखा विक्रम 

Ind vs Eng 4th Test : रविचंद्रन अश्विनने इंग्लंड विरुद्ध १०० बळी आणि १००० कसोटी धावा पूर्ण केल्या आहेत 

208
Ind vs Eng 4th Test : रविचंद्रन अश्विनच्या नावावर ‘हा’ अनोखा विक्रम 
Ind vs Eng 4th Test : रविचंद्रन अश्विनच्या नावावर ‘हा’ अनोखा विक्रम 

ऋजुता लुकतुके

३७ वर्षीय रविचंद्रन अश्विनसाठी (Ravichandran Ashwin) ही कसोटी मालिका विक्रम घडवण्याची मालिका आहे. (Ind vs Eng 4th Test) राजकोटमध्ये त्याने कसोटीतील ५०० बळींचा टप्पा पार केला. आणि आता रांची कसोटीच्या पहिल्या दिवशी त्याने एक दुर्मिळ कामगिरी केली आहे. इंग्लिश डावाच्या २२ व्या षटकात त्याने जॉनी बेअरस्टोला पायचीत केलं. बेअरस्टोचा स्विप फटका चुकला. आणि चेंडू त्याच्या मांडीवर बसला. पण, तो यष्ट्यांच्या रेषेत असल्याने त्याला बाद देण्यात आलं. त्याने ३५ चेंडूंत ३८ धावा केल्या होत्या. (Ind vs Eng 4th Test)

(हेही वाचा- Chhatrapati Shivaji Maharaj : छत्रपती शिवाजी महाराजांकडे अवघे १२ मुसलमान सैनिक होते; शिवचरित्रकार मेहेंदळे यांची पुरोगाम्यांना सणसणीत चपराक )

अश्विनची  (Ravichandran Ashwin) इंग्लंड (England) संघाविरुद्धचा हा १०० वा बळी होता. आणि या संघाविरुद्ध १००० कसोटी धावा त्याने आधीच्या कसोटीतच (Ind vs Eng 4th Test) पूर्ण केल्या होत़्या. एकाच संघाविरुद्ध १०० बळी आणि १००० धावा अशी अष्टपैलू कामगिरी करणारा भारताचा तो पहिलाच क्रिकेटपटू आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरही अशी कामगिरी करणारे आणखी फक्त ६ खेळाडू आहेत. (Ind vs Eng 4th Test)

आंतरराष्ट्रीय स्तरावर जॉर्ज गिफन (George Giffen) आणि जॉनी नोबल (Johnny Noble) या ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी इंग्लंड (England) विरुद्ध ही कामगिरी केली आहे. तर विल्फ्रेड ऱ्होड्स या इंग्लिश खेळाडूने ऑस्ट्रेलिया विरुद्ध आणि सर गारफिल्ड सोबर्स यांनी इंग्लंड विरुद्ध १००० धावा आणि १०० बळी घेण्याची कामगिरी केली आहे. इंग्लिश संघाचा दिग्गज अष्टपैलू खेळाडू इयान बॉथम यांनीही ऑस्ट्रेलिया विरुद्ध ही कामगिरी केली आहे. तर अगदी अलीकडे स्टुअर्ट ब्रॉडने ऑस्ट्रेलिया विरुद्धच ही कामगिरी केली आहे.

थोडक्यात अश्विन (Ravichandran Ashwin) ही कामगिरी करणारा भारतीय उपखंडातील पहिला अष्टपैलू खेळाडू ठरला आहे. रांची कसोटीत पहिल्या दिवशी इंग्लिश संघाने ७ बाद ३०२ धावा केल्या आहेत.(Ind vs Eng 4th Test)

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.