ऋजुता लुकतुके
भारताचा स्टार भालाफेकपटू नीरज चोप्रा (Neeraj Chopra) आपलं सरावाचं केंद्र दक्षिण आफ्रिकेतून तुर्किएला हलवणार आहे. तिथल्या अंतालिआ शहरातील ग्लोरिया स्पोर्ट्स (Gloria Sports) अरेना इथं तो ७९ दिवस सराव करणार आहे. मार्चच्या पहिल्या आठवड्यात तो तुर्किएला रवाना होईल. तिथल्या सराव सत्रानंतर त्याच्यासमोरचं पहिलं आव्हान असेल ते कतार इथं होणारी डायमंड लीग स्पर्धा (Diamond League) आणि त्यानंतर पॅरिस ऑलिम्पिकमध्ये (Paris Olympics) आपलं सुवर्ण राखण्याचा प्रयत्न तो करेल. (Neeraj Chopra)
(हेही वाचा- WPL 2024 : डब्ल्यूपीएलच्या रंगारंग उद्घाटन सोहळ्यात शाहरुख खानची उपस्थिती )
नीरजबरोबर (Neeraj Chopra) त्याचे वैयक्तिक प्रशिक्षक क्लाऊस बर्टोनिझ आणि फिजिओ इशान मारवाही असतील. मे महिन्याच्या अखेरपर्यंत तो तुर्किएतच सराव करणार आहे. खरंतर डिसेंबर २०२३ पासूनच नीरजने आपला ऑलिम्पिकसाठीचा सराव सुरू केला आहे. आतापर्यंत तो दक्षिण आफ्रिकेत पोशेफ्सरुम इथं होता. पण, आता त्याने युरोपात सरावासाठी जाण्याचा निर्णय घेतला आहे. फेब्रुवारीच्या २९ तारखेपर्यंत तो दक्षिण आफ्रिकेतच असेल.
Neeraj shifted his training base to Turkey
📷 – TOI pic.twitter.com/HYccxR23ZM
— 🇮🇳 Thomas Cup 🏆 (@Anmolkakkar27) February 23, 2024
क्रीडा मंत्रालयाने (Ministry of Sports) नीरज चोप्राच्या (Neeraj Chopra) युरोपमध्ये सराव करण्याच्या प्रस्तावाला मान्यता दिली आहे. त्यामुळे नीरजचा आणि त्याच्या प्रशिक्षकांचा तुर्किएमधील खर्चहा ऑलिम्पिक मोहीमे अंतर्गत केला जाईल. नीरज बरोबरच क्रीडा मंत्रालयाने (Ministry of Sports) अंजुम मोदगील, नीरज राजपूत आणि रमिता यांच्या सरावाचा खर्चही उचलण्याचं मान्य केलं आहे. तर टेबलटेनिसपटू श्रीजा अकुजा आणि अर्चना कामत यांनाही स्पर्धांसाठी बाहेर पाठवण्याला मंत्रालायने मान्यता दिली आहे. (Neeraj Chopra)
तर टारगेट ऑलिम्पिक पोडिअम (olympic podium) अर्थात टॉप्स अंतर्गत आणखी ६ खेळाडूंना आता भत्ता मिळणार आहे. यात एक आहे टेनिसपटू सुमित नागल. तर इतर पाच खेळाडू आहेत सोमन राणा, भाग्यश्री जाधव, रामपाल, सिमरन आणि कपिल पारा.
हेही पहा-
Join Our WhatsApp Community