Atul Save : वर्षभरात एक लाख घरे देणार -गृहनिर्माणमंत्री अतुल सावे 

कोकण मंडळातील ५३११ घरांची सोडत

192
म्हाडाच्या ३७० सदनिकांच्या विक्री किंमतीत कपात; Atul Save यांची माहिती
राज्यातील प्रत्येकाला हक्काचे घर मिळीवे, असा शासनाचा संकल्प (Atul Save) असून पुढील वर्षभरात एक लाख घरे वितरित करण्याचा गृहनिर्माण विभागाचा संकल्प असल्याचे प्रतिपादन गृहनिर्माण मंत्री अतुल सावे (Atul Save) यांनी आज येथे केले.
म्हाडाच्या (mhada) कोकण मंडळाच्या ५३११ घरांची सोडत आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या उपस्थितीत आज काढण्यात आली.
पंतप्रधान मोदी (PM Narendra Modi) यांच्या संकल्पनेनुसार देशाची अर्थव्यवस्था पाच ट्रिलियन डॉलर करण्यासाठी सर्वांना हक्काचे घर मिळणे गरजेचे आहे. त्यासाठी महाराष्ट्र शासन विविध प्रकल्प राबवित आहे. (Atul Save)
म्हाडाच्या (mhada) कोकण मंडळाद्वारे आज ५३११ घरांची सोडत काढण्यात आली. प्रथमच पारदर्शक पद्धतीने सोडत काढण्यात आली. याद्वारे कुणालाही तक्रार करण्याची संधी ठेवण्यात आली नाही. निवड झालेल्या लाभार्थींना ऑनलाईन मेसेज पाठविण्यात आले. (Atul Save)
मागील काही वर्षांपासून घरांची नोंदणी अधिक सुलभ करण्यात आली आहे. ई फॉर्म पद्धत सुरू करण्यात आली असून नागरिकांचा त्रास कमी झाला आहे. यापुढे लाभार्थींना पैसे भरण्याचा त्रास होणार नाही, याची काळजी घेतली जात आहे. (Atul Save)
यापूर्ली शासनाने पारदर्शकता आणून मुंबई, पुणे मंडळाची संगणकीय पद्धतीने सोडत काढली आहे. नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या हस्ते सोलापूर जिल्ह्यात १५ हजार घरांचे वितरण करण्यात आले. (Atul Save)
आगामी काळात गिरणी कामगारांना (mill workers) हक्काचे घर देण्याचा आमचा संकल्प आहे.  कामगार आयुक्तांच्या माध्यमातून दीड लाख गिरणी कामगारांची (mill workers) नोंदणी करण्यात आली असून त्यांना लवकरच हक्काच्या घरांचे वितरण करण्यात येणार आहे, असे सावे म्हणाले. (Atul Save)
हेही पहा- 
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.