Raj Thackeray: तुतारी निशाणी मिळाली तर ती फुंका, मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी केली शरद पवारांवर टीका

200
Raj Thackeray : वाढत्या उष्म्यामुळे शाळांना सुट्टी द्या

शरद पवार यांनी (Raj Thackeray) आतापर्यंत केव्हाच छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेतले नाही, पण आता संकट काळात त्यांना छत्रपती आठवत आहेत. त्यांना आज रायगडाची आठवण झाली. आतापर्यंत त्यांना शिवरायांचे नाव घेतल्यास मुस्लिमांची मते मिळणार नाहीत, असे वाटत होते. अशा शब्दांत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर निशाणा साधला आहे.

शरद पवार गटाला तुतारी फुंकणारा माणूस हे नवे निवडणूक चिन्ह मिळाले आहे. या चिन्हाचे शनिवारी रायगडावर लॉंचिंग करण्यात आले. पत्रकारांनी याविषयी राज ठाकरे यांना विचारले असता त्यांनी शरद पवार यांना शाब्दिक टोले लागवले. तुतारी चिन्ह मिळाले, तर आता ती फुंका. मी काय करू त्याचे? तुम्हाला आठवत असेल, तर मी एका मुलाखतीत शरद पवार यांना तुम्ही शाहू, फुले, आंबेडकर नाव घेता, पण छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेत नाही, असा प्रश्न केला होता. त्यावर त्यांनी मौन साधले होते, कारण छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेतले, तर मुस्लिमांची मते जातात, अशा संभ्रमावस्थेत त्यांनी एवढी वर्षे काढली. आता त्यांना रायगड आठवला आहे, असे राज ठाकरे म्हणाले.

(हेही वाचा – Karnataka Cricketer Dies : कर्नाटकच्या क्रिकेटपटूचा ३४ व्या वर्षी मैदानात मृत्यू )

राजकारणाचा चिखल करणाऱ्यांना वठणीवर आणले पाहिजे

सद्यस्थितीत महाराष्ट्रात राजकीय चिखलफेक सुरू असल्याचे मतही राज ठाकरे यांनी यावेळी व्यक्त केले आहे. पुण्यात काही दिवसांपूर्वी १००व्या नाट्य संमेलन कार्यक्रमात राष्ट्रवादीचे काही नगरसेवक मला भेटले. मी त्यांना तुम्ही कोणत्या गटाचे, असा प्रश्न केला. त्यावर काही जणांनी आपण शरद पवार गटाचे असल्याचे सांगितले. असे विचित्र वातावरण महाराष्ट्राने  कधीही पाहिले नव्हते. जनतेनेच या लोकांना वठणीवर आणले पाहिजे. लोकांनी जर यांना वठणीवर आणले नाही, तर महाराष्ट्राचा अजून चिखल होत राहिल, असे राज ठाकरे म्हणाले. पुढे ते म्हणाले की, राजकारणाचा चिखल करणाऱ्यांना वठणीवर आणले पाहिजे. लोकांनी वठणीवर आणले नाहीतर राजकारणाचा चिखल होईल.  महाराष्ट्रातील जनतेने सर्वांना वठणीवर आणले नाही तर, महाराष्ट्राचे काही खरे नाही, असेही ते म्हणाले.

निवडणूक आयोगाला इशारा 

निवडणूक आयोगाविषयी बोलताना राज ठाकरे यांनी सांगितले की, निवडणुक आयोग पाच वर्ष काय करतो? निवडणुकीसाठी यंत्रणा उभी का करू शकत नाही? असा सवालही राज ठाकरेंनी केला. दरम्यान, शिक्षकांना इलेक्शन ड्युटी देऊन बघा. निवडणूक आयोग शिक्षकांवर कोणती कारवाई करतात, ते बघतोच, असा इशारा त्यांनी दिला आहे.

हेही पहा – 

 

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.