उल्हासनगरमधील गोळीबार प्रकरणी मनसे प्रमख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी पहिल्यांदाच वक्तव्य केलं आहे. ते म्हणाले की, गणपत गायकवाड यांनी इतकं टोकाचं पाऊल का उचललं, याची चौकशी झाली पाहिजे. भाजप आमदार गणपत गायकवाड (BJP MLA Ganpat Gaikwad) यांच्याकडून शिंदे गटाचे कल्याण शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार करण्यात आला होता.
यावर राज ठाकरे म्हणाले, एखादा माणूस पोलीस स्थानकात टोकाचे पाऊल उचलत असेल, तर त्याची मानसिक स्थिती काय असेल, याचा विचार केला पाहिजे. वरिष्ठ पोलीस निरीक्षकाच्या केबिनमध्येच जाऊन गोळीबार करण्यापर्यंत कोणी आणले, याची सखोल चौकशी झाली पाहिजे. कोर्टात ती चौकशी होणार असून सत्य बाहेर येईलच, अशी खात्रीही यावेळी राज ठाकरे यांनी दिली.
(हेही वाचा – Raj Thackeray: तुतारी निशाणी मिळाली तर ती फुंका, मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी केली शरद पवारांवर टीका)
Join Our WhatsApp Community