Dombivli: … तर जनतेने भानावर येणे आवश्यक – राज ठाकरे

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कल्याण लोकसभा मतदार संघाची चाचपणी करण्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी डोंबिवलीत मनसेच्या पदाधिकाऱ्यांशी पतिस्थितीची जाणीव करून घेतली.

227
Raj Thackeray : वाढत्या उष्म्यामुळे शाळांना सुट्टी द्या

राजकीय वातावरण गढूळ झाले असून पक्ष विरुद्धच्या अपक्ष, चिन्ह विरुद्ध चिन्ह असा सावळा गोंधळ घालून राजकारण लढणे हे महाराष्ट्रासाठी चांगले चिन्ह नाही. जर या सगळ्यात सुधारणा करायची असेल, तर जनतेने आता भानावर येणे आवश्यक आहे. राजकीय वातावरण दूषित करणाऱ्या लोकांना जनतेनेच वठणीवर आणले पाहिजे. पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान व्हावे हे ठीक, पण त्यासाठी राज्याच्या पातळीवर काय राजकारण होत आहे. नवीन लोकं राजकारणात येत आहेत. त्यांना राजकारणाची अशीच रीत आहे, असा समज होईल. पूर्वी महाराष्ट्रात अशा अस्थिर परिस्थितीचा अनुभव नाही असे मत राज ठाकरे यांनी डोंबिवलीत पत्रकारांशी संवाद साधताना सांगितले.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कल्याण लोकसभा मतदार संघाची चाचपणी करण्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी डोंबिवलीत मनसेच्या पदाधिकाऱ्यांशी पतिस्थितीची जाणीव करून घेतली. तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचा शनिवारी रायगड येथील कार्यक्रमाबाबत टिपणी करतांना सांगितले की, नेहमी फुले, शाहू, आंबेडकर अशीच आठवण असणाऱ्या शरद पवारांना आज छत्रपती शिवाजी महाराजांची आठवण काशी झाली. आजच त्यांना रायगड कसा आठवला.

तर ईव्हीएम विषयावर बोट ठेवत ते म्हणाले, सर्वच देशात बॅलेट पेपरच्या निवडणुका होतात. भारतामध्ये का नाही चालत. मतदाराला ईव्हीएम वर स्लीप देण्यात येणार असे बोलले जात होते हे सगळीकडे झाले नाही. ईव्हीएमचा काहीतरी घोळ आहे हे मी कायमच बोलत होतो.

(हेही वाचा – Lok Sabha Election 2024 : ममता बॅनर्जी काँग्रेसवर खवळल्या उपकाराची भाषा भोवणार )

बेरोजगार, पाणी प्रश्न या प्रश्नाकडे दुर्लक्ष
बेरोजगार, पाणी प्रश्न या प्रश्नाकडे दुर्लक्ष करण्यासाठी जातीचे राजकारण केले जात आहे. शाळेतल्या शिक्षकांना निवडणूक आयोगाचे अधिकारी कामाला जुंपतात. या सगळ्यांमध्ये निवडणूक आयोगाचे अधिकारी करतात काय ? ही यंत्रणा अपुरी आहे असे ते सांगतात तर मग हे पाच वर्षे काय करीत असतात. राज्यात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. जर आमदार एखाद्या राजकीय पक्षाच्या नेत्यावर जेव्हा गोळीबार करतो त्यावेळी त्या आमदाराची मानसिक परिस्थिती काय असेल याचा विचार करणे आवश्यक आहे. पोलिसांनी त्यानुसारच चौकशी केली पाहिजे असेही मत राज ठाकरे यांनी व्यक्त केले.

विद्यार्थ्याना पुस्तक भेट
यावेळी मराठी शाळा वाचवा मोहीम अंतर्गत जीवन मढवी सर यांच्या संकल्पनेतून गणेशोत्सवातून शैक्षणिक विचारधारा सोशल मिडीयाच्या माध्यमातून संपुर्ण महाराष्ट्रभर जनजागृती गेली कित्येक वर्ष केली जात आहे. याच पार्श्वभुमीवर राज ठाकरे यांनी जिल्हा परिषद शाळा भाल येथील नाविण्यपुर्ण उपक्रमातून मराठी शाळा वाचविण्यासाठी केलेली उपाययोजना याची दखल घेत मराठी भाषा दिन निमित्त अशोक तारमळे (मुख्याध्यापक भाल), जीवन मढवी आणि उपस्थित विद्यार्थ्याना पुस्तक भेट दिलं.

राज ठाकरेंना चहा, धावपळ कार्यकर्त्यांची
मनसे अध्यक्ष राज ठाकरे शनिवारी डोंबिवली येथील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या भेटीसाठी आले. दरम्यान त्यांनी डोंबिवली येथील आप्पा दातार चौकातील त्यांच्या कार्यालयात भेट दिली. यावेळी राज ठाकरे यांना चहा पिण्याची इच्छा झाली. आमदार राजू पाटील यांच्यासह पदाधिकारी अचंबित झाले कारण हे अपेक्षित नसेल त्यामुळे काही वेळ धावाधाव झाली. साहेबाना चांगल्या कपात चहा मिळावा याकरिता सर्व धावले आणि कप जमा झाले. राजसाहेबांना चहा पिण्यासाठी एक नव्हे दोन नव्हे तर दीड डझन कप आणले गेले त चक्क नवे कोरे आणि त्यामध्ये काचेचा कटिंग चहाचा ग्लासही एक कार्यकर्त्यांने आणला.

पुस्तकं प्रदर्शनाचे उद्घाटन 
पूर्वेकडील श्रीगणेश मंदिरात गणपती बाप्पाचे दर्शन राज ठाकरे यांनी घेतले. त्यानंतर आप्पा दातार चौकातील त्यांच्या मनसेच्या मध्यवर्ती शाखेच्या बाहेर भाषा दिनानिमित्त पै फ्रेण्ड्स लायब्ररी तर्फे पुस्तक प्रदर्शनाचे भरविले असून या प्रदर्शनाचे उद्घाटन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केले. यावेळी राज ठाकरे यांनी काही मराठी शाळेतील विद्यार्थ्यांना पुस्तकेदेखील भेट दिली व ही सगळी पुस्तकं वाचा असा असे विद्यार्थ्यांना सांगितले.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.