Vanchit Bahujan Aghadi अजून तळ्यात-मळ्यात

मविआतील पक्षांशी स्वतंत्र वाटाघाटी

256
Vanchit Bahujan Aghadi: वंचित बहुजन आघाडीकडून १० उमेदवारांची पाचवी यादी जाहीर

राज्यातील विरोधी पक्षांची महाविकास आघाडी (MVA) ही प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीला खेळवते आहे, की वंचित (Vanchit) आघाडी ‘मविआ’ला, हेच कळायला मार्ग नाही. वंचित (Vanchit) आघाडीचे अद्याप तळ्यात-मळ्यात सुरु असल्याचे चित्र सध्या राज्याच्या राजकारणात दिसत आहे. (Vanchit Bahujan Aghadi)

मविआतील पक्षांशी स्वतंत्र वाटाघाटी

काँग्रेस, राष्ट्रवादी (शप) आणि शिवसेना उबाठा यांच्या महाविकास (MVA) आघाडीने आपापसात जागा वाटप अंतिम करावं आणि त्यानंतर वंचित आघाडी प्रत्येक पक्षाशी स्वतंत्र चर्चा करेल आणि त्या पक्षांच्या वाट्याला आलेल्या जागांवर वंचितला (Vanchit) हव्या असलेल्या जागांबाबत वाटाघाटी करेल, असे आंबेडकर यांनी स्पष्ट केले. (Vanchit Bahujan Aghadi)

(हेही वाचा – Ashok Chavan : अशोक चव्हाण यांचा पहिला धक्का; नांदेडमधील काँग्रेसच्या ५५ माजी नगरसेवकांचा भाजपात प्रवेश)

‘मविआ’ने त्यांचा मसुदा आम्हाला दाखवावा

“मविआमधील (MVA) पक्षांनी त्यांच्या पक्षाचा मसुदा आम्हाला दाखवावा. ज्यामुळे एकमेकांना कळेल की, आपण कोणत्या मुद्द्यावर एकत्र आहोत आणि कोणत्या मुद्द्यावर नाही. महाविकास (MVA) आघाडीने त्यांचा अंतर्गत मसुदा एकमेकांना दाखवला असेल, तो आम्हाला दाखवावा. मसुदा आवडो न आवडो हा मुद्दा नाही. आमची (Vanchit) पहिल्यापासून ही भूमिका आहे की, मविआमधील (MVA) सगळे पक्षांचे मसुदयावर एकमत आहे किंवा नाही हे एकमेकांना कळले पाहिजे,” असे आंबेडकर म्हणाले. (Vanchit Bahujan Aghadi)

बैठकीचे निमंत्रण नाही

“महाविकास (MVA) आघाडीची जगावाटपांबाबत २७ फेब्रुवारीला बैठक आयोजित करण्यात आली असून मविआने (MVA) बैठकीचे निमंत्रण अजून तरी आम्हाला आलेले नाही. निमंत्रण आले, तर आम्ही बैठकीला जाणार आहोत,” असे आंबेडकर यांनी स्पष्ट केले. त्यामुळे वंचितचे (Vanchit) अजून तळ्यात-मळ्यात ठरले नसल्याचे चित्र आहे. (Vanchit Bahujan Aghadi)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.