Ajay Maharaj Baraskar: सर्व काळे धंदे समोर येतील, उद्या सत्याचे बॉम्ब फुटणार, बारसकर यांचा मनोज जरांगेंवर आरोप

बारसकर महाराजांनी केलेल्या टीकेला जरांगेंनी पलटवार देऊन प्रत्युत्तर दिले आहे.

343
Ajay Baraskar Maharaj: कालच्या तमाशामुळे मराठा समाजाची बदनामी झाली, विचारलेल्या प्रश्नांची उत्तर द्या; बारसकर महाराजांचा जरांगेंवर हल्लाबोल
Ajay Baraskar Maharaj: कालच्या तमाशामुळे मराठा समाजाची बदनामी झाली, विचारलेल्या प्रश्नांची उत्तर द्या; बारसकर महाराजांचा जरांगेंवर हल्लाबोल

मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी २००६पासून मी काम करत आहे. आंदोलनासंदर्भात जरांगे यांना प्रश्न विचारले तेव्हा त्यांनी बिनबुडाचे आणि व्यक्तिगत आरोप केले आहेत. जगद्गुरु तुकाराम महाराज यांची माफीदेखील जरांगे यांनी अहंकाराने मागितली असल्याचा आरोप अजय महाराज बारसकर (Ajay Maharaj Baraskar) यांनी मनोज जरांगे यांच्यावर केली आहे.

बारसकर पुढे म्हणाले की, जगद्गुरु तुकाराम महाराज यांची जरांगे यांनी मागितलेली माफीदेखील अहंकार होती. तुमचा मी पणा, श्रेयवाद यावर मी बोट ठेवले. मी मराठा आरक्षणावर प्रश्न विचारले असता, त्याने माझ्यावर चुकीचे आरोप केले, पण त्या आरोपाला कोणताच आधार नाही. मी जे प्रश्न विचारले त्याचे उत्तर जरांगेकडे नाही. एक दिवस त्यांचे सर्व काळे धंदे समोर येतील, तेव्हा समाजच जरागेंना मारेल. सभ्य, विवेकी आणि तत्त्वज्ञानी माणसाला जरांगे यांची भाषा अजिबात पटणार नाही. जरांगे यांनी माझा अपमान केला. त्याची माफी ही आंतरवाली सराटी येथील स्थानिक लोकांनी मागितली आहे.

असे सांगून बारसकर महाराज म्हणाले की, लोणावळ्यात बंद दाराआड चर्चा झाली. त्यात डील काय झालं, यावर तुम्ही बोलत नाही. १४ जानेवारीला सभेला ६ मागण्या मान्य केल्या होत्या. त्यात सरसकट मागणी होती. त्या बंद दाराआड मिटींगमध्ये सरसकट शब्द सोडून दिला. लोणावळ्यात यांनी मागणी बदलली. सरसकट शब्द का सोडला. कोपर्डी प्रकरणाची मागणी ही सरकारकडे नव्हे तर कोर्टाकडे केली पाहिजे. मुळात या माणसाकडे अकलेचा पत्ता नाही.

१० तारखेपासून कोणाच्या सांगण्यावरून पुन्हा आंदोलनाला बसला. यात कोणताही ट्रॅप नाही. ट्रॅप हा काळा धंदा करणाऱ्यांवर करत असतात, असा प्रश्नही बारसकर यांनी विचारला आहे.

(हेही वाचा – Chief Minister Eknath Shinde: आरक्षण कसे टिकेल यावर सकारात्मक चर्चा व्हायला हवी, मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना टोला)

मनोज जरांगेंचा पलटवार…
बारसकर महाराजांनी केलेल्या टीकेला जरांगेंनी पलटवार देऊन प्रत्युत्तर दिले आहे. ते म्हणाले की, माझा मराठा समाज उत्तर देईल. बारसकरला उत्तर देण्यास मी बांधिल नाही, असे म्हणत बारसकरांनी केलेले सर्व आरोप मनोज जरांगेंनी फेटाळून लावले आहेत. बारसकर महाराज यांनी ३०० कोटी रुपयांची संपत्ती जमा केली, असा आरोपही मनोज जरांगे यांनी केला आहे. यावर बारसकर म्हणाले की, मग एवढ्या मोठ्या समाजाच्या व्यासपीठावरून असे आरोप लावणे चुकीचे आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.