Galaxy Fit3 : सॅमसंग गॅलॅक्‍सीचे नवीन फिटनेस ट्रॅकर फिट३ लाँच

नवीन डिझाइन असलेला गॅलॅक्‍सी फिट३ वापरकर्त्‍यांना स्‍मार्टपणे व्‍यायाम करण्‍यास, आरोग्‍याबाबत माहिती मिळण्‍यास आणि सुधारित कनेक्‍टेड अनुभवांचा आनंद घेण्‍यास मदत करतो. 

221
Galaxy Fit3 : सॅमसंग गॅलॅक्‍सीचे नवीन फिटनेस ट्रॅकर फिट३ लाँच

नवीन डिझाइन असलेला गॅलॅक्‍सी फिट३ (Galaxy Fit3) वापरकर्त्‍यांना स्‍मार्टपणे व्‍यायाम करण्‍यास, आरोग्‍याबाबत माहिती मिळण्‍यास आणि सुधारित कनेक्‍टेड अनुभवांचा आनंद घेण्‍यास मदत करतो. सॅमसंग या भारतातील सर्वात मोठ्या ग्राहक इलेक्‍ट्रॉनिक्‍स ब्रॅण्‍डने आज शनिवारी त्‍यांचा नवीन फिटनेस ट्रॅकर गॅलॅक्‍सी फिट३ (Galaxy Fit3) च्‍या लाँचची घोषणा केली. हा नवीन फिटनेस ट्रॅकर सॅमसंगच्‍या प्रगत हेल्‍थ-मॉनिटरिंग तंत्रज्ञानाचे लोकशाहीकरण करत सर्वांना उत्तम फिटनेस राखण्‍यास आणि आरोग्‍यदायी जीवनशैलीचा अवलंब करण्‍यास प्रेरित करतो. गॅलॅक्‍सी फिट३ (Galaxy Fit3) हा सॅमसंगचा नवीन वीअरेबल डिवाईस आहे. या डिवाईसमध्‍ये अॅल्‍युमिनिअम बॉडीसह व्‍यापक डिस्‍प्‍ले आहे, ज्‍यामुळे वापरकर्ते दररोज व्‍यायामापासून शांतमय झोपेपर्यंत अहोरात्र त्‍यांच्‍या मनगटांवरून त्‍यांचे आरोग्‍य व वेलनेस डेटावर देखरेख ठेवू शकतात. (Galaxy Fit3)

”वेलनेसच्‍या या नवीन युगामध्‍ये वापरकर्त्‍यांची त्‍यांच्‍या आरोग्‍याबाबत अधिक सर्वसमावेशक माहिती मिळण्‍याची इच्‍छा आहे आणि सॅमसंग वापरकर्त्‍यांना त्‍यांच्‍या वेलनेस प्रवसामध्‍ये मदत करण्‍यासाठी प्रगत हेल्‍थ मॉनिटरिंग टूल्‍स प्रदान करण्‍याप्रती कटिबद्ध आहे,” असे सॅमसंग इंडियाच्‍या एमएक्‍स बिझनेसचे वरिष्‍ठ संचालक आदित्‍य बाबर म्‍हणाले. ”आमचा नवीन फिटनेस ट्रॅकर गॅलॅक्‍सी फिट३ (Galaxy Fit3) मधून उपलब्‍ध होण्‍याजोगी संसाधने प्रदान करण्‍याप्रती आमची कटिबद्धता दिसून येते, ज्‍यामधून प्रत्‍येकाला दररोज वेलनेस व फिटनेस उत्तम राखण्‍यास प्रेरणा मिळते.” (Galaxy Fit3)

टिकाऊ व कॉम्‍पॅक्‍ट ट्रॅकरसह मोठे, अधिक स्‍टायलिश डिस्‍प्‍ले

गॅलॅक्‍सी फिट३ (Galaxy Fit3) अॅल्‍युमिनिअम बॉडी आणि १.६-इंच डिस्‍प्‍लेसह डिझाइन करण्‍यात आले आहे, जे पूर्वीच्‍या मॉडेलपेक्षा ४५ टक्‍के मोठे आहे, ज्‍यामुळे वापरकर्त्‍यांना क्षणात सविस्‍तर माहिती तपासणे सुलभ जाते. गॅलॅक्‍सी फिट३ वजनाने हलका आणि स्‍लीक आहे, मनगटावर आरामात फिट बसतो, ज्‍यामुळे दररोज वापरता येऊ शकतो. वापरकर्ते त्‍यांच्‍या जीवनशैलीमध्‍ये गॅलॅक्‍सी फिट३ (Galaxy Fit3) चा समावेश करू शकतात. या डिवाईसमधील दीर्घकाळापर्यंत टिकणारी बॅटरी जवळपास १३ दिवस कार्यरत राहू शकते. वापरकर्ते त्‍यांच्‍या ट्रॅकरला वैयक्तिकृत करू शकतात आणि १०० हून अधिक प्रीसेट्समधून त्‍यांचे आवडते वॉच फेस निवडत अधिक स्‍टायलिश करू शकतात किंवा पार्श्‍वभूमीला त्‍यांचे स्‍वत:चे फोटोज सेट करू शकतात. वापरकर्ते त्‍यांचे फॅशन व दैनंदिन नित्‍यक्रमानुसार वन-क्लिक बटनासह बॅण्‍ड्स मिक्‍स व मॅच करू शकतात. (Galaxy Fit3)

दिवस-रात्र तुमच्‍या हेल्‍थ मेट्रिक्‍सवर देखरेख ठेवा

सॅमसंगने सर्वोत्तम वेलनेससाठी नेहमी झोपेला प्राधान्‍य दिले आहे, तसेच वापरकर्त्‍यांना त्‍यांच्‍या झोपेच्‍या पद्धती समजण्‍यास सक्षम करत आहे आणि प्रगत स्‍लीप मॉनिटरिंग टूल्‍ससह आरोग्‍यदायी सवयी अंगिकारण्‍यास प्रेरित करत आहे. ही कटिबद्धता गॅलॅक्‍सी फिट३ (Galaxy Fit3) मधून दिसून येते. वापरकर्ते रात्रभर आरामात गॅलॅक्‍सी फिट३ परिधान करू शकतात, जेथे ते त्‍यांच्‍या झोपेच्‍या पद्धतींवर देखरेख ठेवते, तसेच घोरण्‍याला ओळखत रक्‍तातील ऑक्सिजन पातळ्यांवर देखरेख ठेवते, ज्‍यामधून अधिक सविस्‍तर माहिती मिळते. वैयक्तिक झोपेच्‍या पद्धतींवर आधारित गॅलॅक्‍सी फिट३ (Galaxy Fit3) वापरकर्त्‍यांना वैयक्तिकृत स्‍लीप कोचिंगसह अर्थपूर्ण माहिती देते, ज्‍यामुळे त्‍यांना अधिक सर्वोत्तमपणे त्‍यांच्‍या झोपेच्‍या पद्धतींबाबत समजण्‍यास मदत होते आणि ते त्‍यानुसार सकारात्‍मक बदल करू शकतात. (Galaxy Fit3)

दिवसा, गॅलॅक्‍सी फिट३ वापरकर्त्‍यांना त्‍यांच्‍या दैनंदिन क्रियाकलापांवर देखरेख ठेवण्‍यास साह्य करते. वापरकर्ते कोणत्‍याही वेळी, कुठेही १०० हून अधिक प्रकारच्‍या वर्कआऊट्सवर देखरेख ठेवू शकतात आणि त्‍यांच्‍या व्‍यायामाचे रेकॉर्डस् सहजपणे पाहू शकतात, ज्‍यामधून त्‍यांना त्‍यांची ध्‍येये साध्‍य करण्‍यास अधिक प्रेरणा मिळेल. गॅलॅक्‍सी फिट३ (Galaxy Fit3) ५एटीएम रेटिंग आणि आयपी६८-रेटेड जलरोधक व धूळरोधक आहे, म्‍हणजेच वापरकर्ते कोणत्‍याही वातावरणामध्‍ये आऊटडोअर क्रियाकलापांचा आनंद घेऊ शकतात. गॅलॅक्‍सी फिट३ वापरकर्त्‍यांना हार्ट रेट व तणाव पातळ्या अशा हेल्‍थ मेट्रिक्‍सची माहिती देण्‍यासह त्‍यांच्‍या एकूण आरोग्‍याबाबत सखोल माहिती देते. (Galaxy Fit3)

(हेही वाचा – Ajay Maharaj Baraskar : मनोज जरांगे पाटील यांची नार्को टेस्ट करा, ते पोपटासारखे बोलतील; अजय महाराज बारस्कर यांचा जाहीर आरोप)

गॅलॅक्‍सी इकोसिस्‍टमध्‍ये सुरक्षित व कनेक्‍टेड राहा

वापरकर्त्‍यांना सुरक्षितता प्रदान करण्‍यासाठी सुरक्षितता वैशिष्‍ट्यांसह नुकतेच गॅलॅक्‍सी फिट३ (Galaxy Fit3) मध्‍ये फॉल डिटेक्‍शन आणि इमर्जन्‍सी एसओएस या वैशिष्‍ट्यांची भर करण्‍यात आली आहे. अॅब्‍नॉर्मल फॉल ओळखताच गॅलॅक्‍सी फिट३ वापरकर्त्‍यांना वेळेवर वैद्यकीय साह्य मिळण्‍यासाठी आपत्‍कालीन सेवांना कॉल करण्‍याचा पर्याय देतो. वापरकर्ते आपत्‍कालीन स्थितीत असल्‍यास साइड बटन पाच वेळा प्रेस करत त्‍वरित एसओएस पाठवू शकतात. गॅलॅक्‍सी फिट३ वापरकर्ते सुधारित वीअरेबल अनुभवासाठी कनेक्‍टेड सॅमसंग गॅलॅक्‍सी इकोसिस्‍टममधील अनेक क्षमतांचा देखील उपयोग करू शकतात. (Galaxy Fit3)

वापरकर्ते गॅलॅक्‍सी फिट३ (Galaxy Fit3) चा त्‍यांच्‍या मनगटावरून कंट्रोलर म्‍हणून वापर करू शकतात, तसेच फोटो काढताना त्‍यांच्‍या स्‍मार्टफोन कॅमेरासाठी रिमोट कंट्रोल म्‍हणून वापर करू शकतात. याव्‍यतिरिक्‍त कॅमेरा रिमोटसह टाइमर्स सेट करू शकतात, त्‍यांच्‍या कनेक्‍टेड डिवाईसवर गेम्‍स खेळण्‍याचा आनंद घेऊ शकतात आणि मीडियावर नियंत्रण ठेवू शकतात. एकसंधी अनुभवासाठी वापरकर्त्‍यांना कोणतेही व्‍यत्‍यय नको असल्‍यास किंवा झोपायला जायचे असल्‍यास ते त्‍यांचा गॅलॅक्‍सी फिट३ (Galaxy Fit3) आणि पेअर केलेल्‍या स्‍मार्टफोनदरम्‍यान आपोआपपणे मोड्स सिंक करू शकतात. स्‍मार्टफोन सापडत नसेल तर वापरकर्ते गॅलॅक्‍सी फिट३ वरील फाइण्‍ड माय फोन वैशिष्‍ट्यासह सहजपणे स्‍मार्टफोन शोधू शकतात, तसेच गॅलॅक्‍सी फिट३ सापडत नसेल तर स्‍मार्टफोनच्‍या माध्‍यमातून या वैशिष्‍ट्यासह शोधू शकतात. (Galaxy Fit3)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.