Shahu Chhatrapati Maharaj : छत्रपतींच्या घरातच फुटीची शक्यता?

Lok Sabha Elections : संभाजीराजे इच्छुक, ऑफर शाहू छत्रपतींना

269
Shahu Chhatrapati Maharaj : छत्रपतींच्या घरातच फुटीची शक्यता?
Shahu Chhatrapati Maharaj : छत्रपतींच्या घरातच फुटीची शक्यता?

कोल्हापूरच्या राजघराण्याचे प्रमुख शाहू छत्रपती महाराज (७६) (shahu Chhatrpati) यांची उमेदवारी महाविकास आघाडीकडून (Mahavikas Aghadi) जवळपास निश्चित झाली असून यामुळे छत्रपतींच्या घरातच फुट पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

घरातच ‘स्वराज्य’ पक्ष

शाहू छत्रपती (shahu Chhatrpati) यांचे चिरंजीव संभाजीराजे छत्रपती यांनी ‘स्वराज्य’ पक्ष (Swarajya Paksh) संघटनेची स्थापना केली आहे. १ फेब्रुवारीला त्यांनी X वर एक पोस्ट केली, त्यात त्यांनी स्पष्ट म्हटले की, “स्वराज्य पक्ष असताना इतर कोणतीही पक्षात प्रवेश करण्याचा प्रश्नच येत नाही. राज्यातील जनतेच्या विश्वासावर महाराष्ट्राच्या सुसंस्कृत राजकारणाचे भविष्य हे स्वराज्य असेल, या ध्येयाने माझी व स्वराज्य पक्ष संघटनेची वाटचाल सुरूच राहणार आहे.” त्यांच्या या पोस्टवर काही संमिश्र प्रतिक्रिया आल्या. (Shahu Chhatrapati Maharaj)

पुत्र इच्छुक, ऑफर पित्याला

अनेकांनी संभाजीराजे यांना पाठींबा दर्शवला तर काहीनी त्यांना कॉँग्रेसकडून, काहीनी भाजप आणि काहीनी शिवसेना उबाठाकडून लोकसभा निवडणूक लढण्याचा सल्ला दिला. दरम्यान, “राज्यसभेतील सहा जागांपैकी महाविकास आघाडीचा फक्त एक उमेदवार निवडून येईल, इतकीच मते तिन्ही पक्षांची, (कॉँग्रेस, ऊबाठा आणि राष्ट्रवादी कॉँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष) मिळून आहेत. त्यात कॉँग्रेसचा एक उमेदवार आणून उर्वरित मतांवर छत्रपती शाहू महाराज (shahu Chhatrpati) यांना सर्वपक्षीयांनी निवडून आणावे,” अशी अपेक्षा उबाठा नेते संजय राऊत यांनी X वर व्यक्त केली होती. यावर नेटकऱ्यांनी राऊतना ट्रोल केले. मात्र शाहू छत्रपती (shahu Chhatrpati) यांचे सुपुत्र छत्रपती संभाजीराजे हे खासदारकीसाठी इच्छुक असतानाही त्यांना उमेदवारी देण्याबाबत महाविकास आघाडीने तोंडावर बोट ठेवले, म्हणून महाविकास आघाडीच्या हेतुवरच संशय व्यक्त केला जात होता. (Shahu Chhatrapati Maharaj)

समाजमाध्यमांपासून अलिप्त

या प्रस्तावानंतर कौटुंबिक वाद निर्माण झाल्याचे सांगण्यात येते. आणि दुसऱ्याच दिवशी, म्हणजे २ फेब्रुवारीपासून संभाजीराजे समाजमाध्यम आणि सार्वजनिक जीवनापासुन अलिप्त झाले, तसेच त्यांनी नियोजित कार्यक्रमदेखील रद्द केले. “काही कारणास्तव उद्यापासूनचे सर्व नियोजित कार्यक्रम वा दौरे रद्द करण्यात आलेले आहेत, क्षमस्व!” असा संदेश असलेली पोस्ट त्यांनी केली. तेव्हापासून संभाजीराजे छत्रपती यांनी समाजमाध्यमांवर, मराठा आरक्षणाबद्दल राज्य सरकारचे अभिनंदन, याव्यतिरिक्त काहीही पोस्ट केली नाही. (Shahu Chhatrapati Maharaj)

लोकसभेसाठी नवी ऑफर

राज्यसभा निवडणूक बिनविरोध झाली. आता पुन्हा एकदा महाविकास आघाडीने शाहू महाराज (shahu Chhatrpati) यांना कोल्हापूरातून लोकसभेसाठी तयार करण्यात आल्याचे कळते. राष्ट्रवादीचे (शप) प्रमुख शरद पवार यांनी नुकतीच शाहू छत्रपती यांची त्यांच्या नवीन राजवाड्यात भेट घेतली. तसेच शाहू छत्रपती (shahu Chhatrpati) यांनीही महाविकास आघाडीकडून लोकसभेसाठी तयार असल्याचे स्पष्ट संकेत दिले. परिणामी, घरातला पक्ष सोडून अन्य पक्षातून निवडणूक लढवल्यास या राजघराण्यात सुप्त संघर्ष निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. (Shahu Chhatrapati Maharaj)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.