Electronic Detonators : कल्याण रेल्वे स्थानकात डिटोनेटर ठेवणाऱ्या दोघांना अटक

333
Electronic Detonators : कल्याण रेल्वे स्थानकात डिटोनेटर ठेवणाऱ्या दोघांना अटक
Electronic Detonators : कल्याण रेल्वे स्थानकात डिटोनेटर ठेवणाऱ्या दोघांना अटक

मुंबई – कल्याण रेल्वे स्थानकात ‘डिटोनेटर’ (Electronic Detonators) ठेवणाऱ्या दोघांना कल्याण रेल्वे पोलिसांनी  (Kalyan GRP) शुक्रवारी रात्री कल्याण स्थानकातून अटक केली आहे. अटक करण्यात आलेले दोघे सराईत गुन्हेगार असून त्यांच्यावर रेल्वे तसेच इतर पोलीस ठाण्यात चोरी, हत्येचा प्रयत्न या प्रकारचे गंभीर गुन्ह्याची नोंद आहे.चोरीच्या उद्देशातून चोरलेल्या बॅगेत बॉम्ब सदृश्य वस्तू बघून घाबरलेल्या या दोघांनी डिटोनेटरची (Electronic Detonators)  बॅग कल्याण रेल्वे स्थानक फलाट क्रमांक १ या ठिकाणी ठेवून पळ काढला होता अशी माहिती कल्याण रेल्वे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंढरीनाथ कांदे यांनी दिली.

(हेही वाचा- Public Transport Card : …तर देशभरात प्रवासासाठी एकच प्री-पेड कार्ड वापरता येणार  )

जॉय डेव्हिड कालवा उर्फ नायडू (२३) आणि ऋषिकेश निकुंभ (२५) असे अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. जॉय हा बदलापूर तर ऋषिकेश हा भिवंडी येथे राहणारा आहे. या दोघांचा  सीसीटीव्ही कॅमेरा फुटेजच्या माध्यमातून शोध घेऊन अटक करण्यात आली आहे. दोन दिवसांपूर्वी कल्याण रेल्वे स्थानक (Kalyan Railway Station)  फलाट क्रमांक १ वर  बंद असलेल्या रेल्वे कॅन्टीन जवळ कल्याण रेल्वे पोलिसांना एक संशयित बॅग आढळून आली होती, या बॅगेत स्फोट घडवून आणण्यासाठी वापरण्यात येणारे ५४ डिटोनेटर मिळून आले होते. कल्याण रेल्वे स्थानकात एवढ्या मोठ्या प्रमाणात डिटोनेटर  (Electronic Detonators)मिळून आल्यामुळे एकच खळबळ उडाली होती.

कल्याण रेल्वे पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून सीसीटीव्हीच्या माध्यमातून डिटोनेटर (Electronic Detonators) ठेवणाऱ्याचा शोध सुरू केला असता पोलिसांना दोन संशयित व्यक्ती सीसीटीव्ही फुटेज मध्ये आढळून आली. या दोघांची ओळख पटवण्यात आली असता दोघे ही पोलिसांच्या अभिलेखावरील गुन्हेगार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या दोघांचा शोध घेऊन दोघांना कल्याण परिसरातून अटक करण्यात आली. या दोघांकडे चौकशी केली असता मंगळवारी हे दोघे कल्याण स्कायवॉक वरून जात असताना स्कायवॉकवर झोपलेल्या व्यक्तीजवळ असलेली बॅग या दोघांनी चोरली, त्यानंतर हे या दोघांनी एका निर्जन ठिकाणी जाऊन बॅग तपासली असता त्यात बॉम्ब सदृश्य (Explosive) वस्तू बघून दोघे घाबरले, व दोघांनी ही बॅग कल्याण रेल्वे स्थानक येथील बंद रेल्वे कॅन्टीन जवळ ठेवुन पोबारा केला अशी माहिती समोर आली. जॉय आणि ऋषिकेश या दोघांना अटक करण्यात आली असून या दोघांवर धारावी ६ गंभीर गुन्ह्याची नोंद असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंढरीनाथ कांदे यांनी दिली. डिटोनेटर (Electronic Detonators) सोबत घेऊन स्कायवॉक वर झोपलेला व्यक्तीचा शोध घेण्यात येत आहे.

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.