केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना सिंधुदुर्गातून उमेदवारी मिळणार आहे, हे आता निश्चित झाले आहे. त्यानुसार त्यांनी काम सुरु केले आहे. यावेळीही त्यांच्या विरोधात उबाठाचे खासदार विनायक राऊत हे उभे राहणार आहेत. अशा वेळी नारायण राणेंच्या समर्थनार्थ शिवसेनेचे नेते, मंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी, नारायण राणे यांना निवडून आणण्यासाठी आपण दिवस-रात्र एक करू, असे आश्वासन दिले.
काय म्हणाले दीपक केसरकर?
नारायण राणे हे आमच्या कोकणाचे सुपुत्र आहेत. त्यांच्याशी आमचा कधीच संघर्ष नव्हता, त्यांच्या खालच्या कार्यकर्त्यांमुळे हा संघर्ष होता. त्यावेळी विनायक राऊत केवळ आपल्यामुळे निवडून आले होते. आता आपण नारायण राणे यांना निवडून आणण्यासाठी दिवस-रात्र एक करू. कुणी मुंबईत राहून सिंधुदुर्ग चालवण्याची भाषा करू नये, अशी टीका विनायक राऊत यांच्यावर दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी केली.
Join Our WhatsApp Community