आक्रमक खेळी खेळणारे भारतीय क्रिकेटपटू Farokh Engineer

209
फारुख इंजिनिअर (Farokh Engineer) यांचा जन्म २५ फेब्रुवारी १९३८ साली मुंबईत झाला. ते एक भारतीय क्रिकेटपटू होते. ते विकेट किपर (यष्टीरक्षक) आणि बॅट्समन (फलंदाज) होते. त्यांनी आपलं शालेय शिक्षण माटुंगा इथल्या डॉन बॉस्को स्कूल मधून पूर्ण केलं. तर उच्च शिक्षण पोद्दार कॉलेजमधून पूर्ण केलं. सुरुवातीला फारुख हे मुंबई संघासाठी क्रिकेट खेळायचे.
फारुख (Farokh Engineer) यांनी आपल्या टेस्ट मॅचच्या कारकिर्दीत भारतीय संघासाठी एकूण सेहेचाळीस सामने खेळले होते. त्यांनी आपल्या टेस्ट मॅचच्या कारकिर्दीत एकूण २६११ धावा केल्या होत्या आणि वन डे मॅचच्या कारकिर्दीत पाच सामन्यांमध्ये ११४ धावा केल्या होत्या. २०१८ साली फारुख इंजिनिअर यांना सियाट पुरस्कार वितरण सोहळ्यात लाईफटाईम अर्चिव्हमेंट हा पुरस्कार प्रदान करण्यात आला होता.
फारुख इंजिनिअर (Farokh Engineer) यांचे वडील मानेकशॉ हे व्यावसायिक डॉक्टर होते आणि त्यांच्या आई मिनी या गृहिणी होत्या. लहानपणी फारुख इंजिनिअर यांचं स्वप्न पायलट व्हायचं होतं. पण जसजसे ते मोठे होत गेले तसतशी त्यांची खेळांमध्ये रुची वाढत गेली.
फारुख इंजिनिअर यांनी आपला पहिला टेस्ट क्रिकेट सामना १ डिसेंबर १९६१ साली इंग्लंडच्या विरोधात खेळला. हा सामना कानपूर येथील मोदी स्टेडियमवर रंगला होता.
बॉलिवूडमधला एक ८३ नावाचा हिंदी चित्रपट आहे. या चित्रपटाचं कथानक १९८३ सालच्या इंग्लंडविरोधी भारतीय सामान्याविषयी चित्रित केलेलं आहे. या चित्रपटात बोमन इराणी यांनी फारुख इंजिनिअर यांची भूमिका साकारलेली आपल्याला पाहायला मिळते.
फारूक इंजिनिअर (Farokh Engineer) हे १९७६ साली आपला शेवटचा सामना खेळले आणि इतर कामं करून क्रिकेटविश्वात आपलं योगदान देत राहिले. त्यानंतरच्या काही वर्षांमध्ये फारुख इंजिनिअर यांना बीसीसीआय चे व्हाईस प्रेसिडेंट म्हणून नेमण्यात आले.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.