पश्चिम बंगालमधील संदेशखलीमध्ये (Sandeshkhali Violence) महिलांच्या शोषणाच्या अनेक घटना समोर येत आहेत. या सगळ्यात सत्ताधारी तृणमूल काँग्रेसचे (टीएमसी) नेते शाहजहान शेख हा प्रमुख आरोपी आहे. शाहजहान शेख हा मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या जवळचा आहे. शाहजहान हा केवळ महिलांवर अत्याचार आणि जमिनी बळकावत नव्हता तर परिसरातील मनरेगा कामगारांचे पैसेही लुबाडत होता. सध्या शहाजहान शेख हा फरार आहे आणि त्याला सत्ताधारी टीएमसीचे पाठबळ असल्याचे बोलले जात आहे.
शहाजहान शेख याच्यावर संदेशखली (Sandeshkhali Violence) येथील महिलांनी लैंगिक छळाचा आरोप केला आहे. पक्षाच्या सभेच्या नावाखाली शहाजहान शेख व त्याचे टोळके सर्व लोकांना बोलावून घेत आणि नंतर पुरुषांना घरी पाठवायचा, महिलांना डांबून ठेवायचा आणि त्यांच्यासोबत गैरवर्तन करायचा, असे महिलांचे म्हणणे आहे. १८ ते ४० वयोगटातील महिला त्याच्या या अत्याचाराला बळी ठरल्या आहेत. त्याचवेळी शहाजहान शेख आणि त्याच्या साथीदारांवर लोकांच्या जमिनीवर बेकायदेशीरपणे कब्जा केल्याचाही आरोप आहे. शहाजहान शेख पश्चिम बंगालच्या रेशन घोटाळ्यातही आरोपी आहेत. या संदर्भात अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) त्याच्या घरावर छापा टाकला होता. मात्र, यादरम्यान अधिकारी आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांवर हल्ला करण्यात आला.
मनरेगाचे वेतन लुबाडायचा
संदेशाखली (Sandeshkhali Violence) येथे शाहजहानच्या अत्याचाराला बळी पडलेल्या बहुतांश महिला या अनुसूचित जमातीच्या आहेत. राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोग (NCST) देखील घटनास्थळी पोहोचला आहे. तेथे आयोगाला कळले की, शहाजहान आणि त्याचे गुंड हे गरीब आदिवासी कुटुंबांकडून मनरेगाचे वेतन लुबाडायचा. जर कोणाकडे पैसे शिल्लक राहिले नाहीत तर ते उधारी घेण्यासाठी बाध्य करायचा. तक्रारकर्त्यांनी राष्ट्रीय आदिवासी आयोगाचे उपाध्यक्ष अनंत नायक यांच्या नेतृत्वाखालील तीन सदस्यीय टीमला सांगितले की, पश्चिम बंगाल पोलिसांचा शाहजहान शेख आणि त्याच्या साथीदारांवर पाठिंबा आहे. त्याच वेळी, नायक म्हणाले की, या समितीकडे आदिवासी महिलांचा लैंगिक छळ आणि शाहजहान आणि त्याच्या साथीदारांकडून जमीन बळकावल्याच्या 50 हून अधिक तक्रारी आल्या आहेत.
बलात्कार नंतर खुनाचे प्रकार सुरूच
२०१९ च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीनंतर येथे मोठ्या प्रमाणात हिंसाचार झाला होता. या हिंसाचारात हिंदू समाजातील लोकांना मोठ्या प्रमाणात लक्ष्य करण्यात आले. सत्ताधारी पक्ष सोडून भाजपला मतदान करणाऱ्यांना या प्रकारच्या हिंसेला सामोरे जावे लागले. त्यांची घरे जाळण्यात आली होती. दररोज अल्पवयीन मुलींवर बलात्कार आणि हत्या झाल्याच्या घटना समोर येत आहेत. मालदा जिल्ह्यात नववीत शिकणाऱ्या मुलीचा अर्धनग्न मृतदेह सापडला आहे. तिची ओळख नष्ट करण्यासाठी तिचे डोके ठेचण्यात आले आहे. बलात्कारानंतर तिची हत्या करण्यात आल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे.
आदिवासी समाजातील ही मुलगी गुरुवार, २२ फेब्रुवारी २०२४ पासून बेपत्ता होती. शुक्रवारी, २३ फेब्रुवारी रोजी मालदा येथील वीटभट्टीतून तिचा मृतदेह सापडला. याआधी 15 फेब्रुवारी 2024 रोजी मालदा येथील मोथाबारी भागात एका मक्याच्या शेतात 25 वर्षीय महिलेचा अर्धनग्न मृतदेह आढळून आला होता. कल्पना मंडल असे पीडित तरुणीचे नाव आहे. सरस्वती पूजेच्या (14 फेब्रुवारी) संध्याकाळी ती बेपत्ता झाली होती. बलात्कारानंतर तरुणीची निर्घृण हत्या करण्यात आल्याचे कुटुंबीयांचे म्हणणे आहे. मृताच्या शरीरावर हल्ल्याच्या खुणा आणि चाकूच्या अनेक जखमा असल्याचे कुटुंबीयांचे म्हणणे आहे.
Join Our WhatsApp Community