जम्मू आणि काश्मीरमधील रविवार धक्कादायक घटना समोर आली आहे. तेथील कठुआ रेल्वे स्थानकावर थांबलेली एक मालगाडी (Train) अचानक पठाणकोटच्या दिशेने रवाना झाली. मोठा उतार असल्याने ट्रेन आपोआपच ड्रायव्हरशिवाय सुरू झाली. तब्बल ८४ किमीपर्यंत ही ट्रेन ड्रायव्हरविना धावली. या सर्व गंभीर प्रकरणाची चौकशी करण्याचा आदेश रेल्वे प्रशासनाने दिला आहे.
ड्रायव्हर चहा पिण्यासाठी गाडीतून खाली उतरला
पंजाबच्या मुकेरिया येथे उंच मार्गावर ही ट्रेन (Train) थांबवण्यात रेल्वे प्रशासनाला यश आले आहे. रविवारी, २५ फेब्रुवारी रोजी सकाळी ७.१० वाजता ही घटना घडली. मालगाडी क्रमांक १४८०६ R सोबत हा प्रकार घडला. येथील स्टेशनवर ट्रेनचा ड्रायव्हर चहा पिण्यासाठी गाडीतून खाली उतरला होता. याचवेळी रुळावर उतार असल्याने गाडीने अचानक वेग धरला आणि ड्रायव्हर विना ही ट्रेन (Train) धावत सुटली. या मालगाडीतून काँक्रीट नेण्यात येत होत, जे कठुआ स्टेशनवरुनच भरण्यात आले होते. जेव्हा ट्रेनचा चालक आणि सहचालक चहा पिण्यासाठी ट्रेनमधून खाली उतरले तेव्हा गाडीचे इंजिन सुरूच होते. ट्रेनमधून उतरण्यापूर्वी चालकाने हँडब्रेक लावला होता का, याची चौकशी करण्यात येणार आहे. या घटनेची गंभीर दखल घेत चौकशीचे आदेश देण्यात आले असून फिरोजपूर येथून एक पथक चौकशीसाठी रवाना झाले आहे.
Join Our WhatsApp Community