Narendra Modi: पंतप्रधानांच्या हस्ते ओखा मुख्यभूमी आणि बेत द्वारका बेटाला जोडणाऱ्या ‘सुदर्शन सेतू’चे उद्घाटन

वैशिष्ट्यपूर्ण रचना असलेला असा सुदर्शन सेतू असून त्यावरील पदपथांवर दोन्ही बाजूंना श्रीमद् भगवद्गगीतेमधील वचने आणि भगवान कृष्णाच्या प्रतिमा आहेत.

161
Narendra Modi: पंतप्रधानांच्या हस्ते ओखा मुख्यभूमी आणि बेत द्वारका बेटाला जोडणाऱ्या 'सुदर्शन सेतू'चे उद्घाटन
Narendra Modi: पंतप्रधानांच्या हस्ते ओखा मुख्यभूमी आणि बेत द्वारका बेटाला जोडणाऱ्या 'सुदर्शन सेतू'चे उद्घाटन

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी रविवारी गुजरातमध्ये सुमारे 980 कोटी रुपये खर्चाने बांधण्यात आलेल्या ओखा मुख्यभूमी आणि बेत द्वारका बेटाला (Okha Mainland and Beit Dwarka Island) जोडणाऱ्या सुदर्शन सेतूचे उद्घाटन केले. 2.32 किमी लांबी असलेला पूल देशातील सर्वात जास्त लांबीचा केबल आधारित पूल आहे.

वैशिष्ट्यपूर्ण रचना असलेला असा सुदर्शन सेतू असून त्यावरील पदपथांवर दोन्ही बाजूंना श्रीमद् भगवद्गगीतेमधील वचने आणि भगवान कृष्णाच्या प्रतिमा आहेत. पदपथाच्या वरच्या भागात एक मेगावॉट वीज निर्माण करणारी सौर पॅनेल्सदेखील बसवण्यात आली आहेत. या पुलामुळे द्वारका आणि बेत द्वारकादरम्यान भाविकांचा प्रवास सुलभ होईल आणि प्रवासाच्या वेळेत लक्षणीय कपात होईल. या पुलाच्या उभारणीपूर्वी भाविकांना द्वारकेला पोहोचण्यासाठी बोटीने प्रवास करावा लागत होता. मानबिंदू असलेला हा पूल देवभूमी द्वारकेचे प्रमुख पर्यटन आणि आकर्षणदेखील ठरेल. या कार्यक्रमाच्या वेळी पंतप्रधानांसोबत गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत, गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल आणि खासदार सी. आर. पाटील उपस्थित होते.

(हेही वाचा – Vande Bharat Train: वंदे भारत रेल्वेचा वेग वाढणार, ‘हे’ होणार बदल; वाचा सविस्तर )

देशातील सर्वात जास्त लांबीचा केबल आधारित पूल

पंतप्रधानांनी त्यांच्या अधिकृत ‘X’वर पोस्ट केले आहे की, “980 कोटी रुपये खर्चाने बांधण्यात आलेला, ओखा मुख्यभूमी आणि बेत द्वारका बेटाला जोडणारा सुदर्शन सेतू 2.32 किमी लांबी असलेला पूल देशातील सर्वात जास्त लांबीचा केबल आधारित पूल आहे.” “आश्चर्यकारक सुदर्शन सेतू!”

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.