पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खोल समुद्रात पाण्याखाली जाऊन द्वारका नगरी जिथे पाण्याखाली गेली होती त्या ठिकाणी जाऊन प्रार्थना केली. पंतप्रधान मोदी यांनी यासंदर्भातील माहिती त्यांच्या अधिकृत ‘X’वर पोस्ट केले आहे. समृद्ध सांस्कृतिक आणि आध्यात्मिक वारसा असलेल्या द्वारका शहराला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आदरांजली वाहिली. पाण्याखाली असलेल्या या ठिकाणी त्यांनी मोरपिसेदेखील अर्पण केली.
पाण्यात बुडलेल्या द्वारका नगरीत प्रार्थना करणे हा एक दिव्य अनुभव होता. मला अध्यात्मिक भव्यता आणि कालातीत भक्तीच्या एका प्राचीन युगाशी जोडल्याचे वाटले. भगवान श्रीकृष्ण आम्हा सर्वांचे कल्याण करो, अशी प्रार्थना मोदींनी केली आहे.
To pray in the city of Dwarka, which is immersed in the waters, was a very divine experience. I felt connected to an ancient era of spiritual grandeur and timeless devotion. May Bhagwan Shri Krishna bless us all. pic.twitter.com/yUO9DJnYWo
— Narendra Modi (@narendramodi) February 25, 2024
(हेही वाचा – Devendra Fadnavis : संरक्षण उद्योगांना चालना देण्यासाठी नवे धोरण तयार करण्यात येईल – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस)
पंतप्रधानांनी ‘X’ वर पोस्ट केले आहे की, “द्वारका नगरीच्या ठिकाणी प्रार्थना करणे हा एक दिव्य अनुभव होता. अध्यात्मिक उन्नती आणि कालातीत भक्तीच्या प्राचीन काळाशी जोडले गेल्याची अनुभूती मला आली. भगवान श्रीकृष्णांचा आपणा सर्वांवर आशीर्वाद राहो”.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community