- अरविंद विठ्ठल कुळकर्णी
भारताच्या ब्रिटिशांविरुद्धच्या स्वातंत्र्य संग्रामातील सर्वोच्च पराक्रम आणि सर्वोच्च त्याग स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकरांच्या नावावर लिहिला गेला आहे. मार्सेलिसच्या उडीने ब्रिटिश साम्राज्य शोषणावर उभे आहे हे आणि निरपराध भारतावर विश्वासघाताने पारतंत्र्य लादले गेले आहे हे सत्य अत्यंत प्रकर्षाने जगासमोर मांडले गेले. स्वातंत्र्यप्राप्तीचे मूल्य सबंध समाजाच्या वतीने अंदमान पर्वात सावरकरांनी प्रातिनिधिक स्वरूपात मोजले आहे. अंदमान पर्वात वीर सावरकरांच्या (Veer Savarkar) सृजनशीलतेचा उत्तुंग आविष्कार आहे. कोलू पिसत असतानाही प्रबोधन आणि संघटन साधून आपण राष्ट्रनिर्माते आहोत, सकारात्मकतेचा आणि प्रयत्नशीलतेचा सजीव साक्षात्कार आहोत हे त्यांनी सिद्ध केले आहे. अंदमान पर्वाने वीर सावरकरांना (Veer Savarkar) चिरंजीव केले आहे. तरीही स्वातंत्र्यसंग्रामातील नेत्यांपैकी सावरकरांविषयी सर्वाधिक अपसमज बुध्या पसरविण्यात आले. देशभक्ती आणि राष्ट्रबांधणी ह्या दोन विषयात वीर सावरकरांचे (Veer Savarkar) जे गुणविशेष सिद्ध झाले त्यांना लोकमान्यता मिळू नये म्हणून स्वतंत्र भारताच्या राज्यकर्त्यांनी कटकारस्थाने केली आणि समाजाने ती सर्वसाधारणपणे सहन केली. ही स्वतंत्र भारताची सगळ्यात मोठी शोकांतिका आहे.
परिस्थिती हळूहळू पालटते आहे. अयोध्येत रामजन्मभूमीवर भव्यदिव्य स्वरूपात राम मंदिर उभे राहत आहे आणि पंतप्रधानांच्या उपस्थितीत बालकरामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा तेथे झाली आहे. हे वीर सावरकर (Veer Savarkar) युग सुरू होत असल्याचे प्रसाद चिन्ह आहे. आपण आणि आपल्या कुटुंबाने भारताचे पारतंत्र्य दूर व्हावे म्हणून जो पराक्रम, त्याग आणि सेवा केली त्यामागे प्रभू रामचंद्रांची प्रेरणा होती, ह्या कामासाठी त्याने आमचे कुटुंब निवडले असे वीर सावरकरांनी (Veer Savarkar) थोरल्या वहिनीला धीर देताना, अटक होण्याच्या आधी लंडनहून पराकोटीच्या अभिमानाने कळविले आहे. भारताच्या स्वातंत्र्य संग्रामाचा भगवान कृष्ण सारथी आहे आणि प्रभू राम सेनानी आहे असे नाशिकच्या न्यायालयात जन्मठेपेची शिक्षा सुनावली गेल्यानंतर केलेल्या ‘पहिला हप्ता’ ह्या कवितेत म्हटलेले आहे. ‘‘हिंदुत्व’ ह्या ग्रंथात वीर सावरकर म्हणतात, ‘अयोध्येच्या महाप्रतापी राजा रामचंद्रांने जेव्हा लंकेमध्ये आपले विजयी पाऊल टाकले आणि उत्तर हिमालयापासून दक्षिण समुद्रापर्यंतची सर्व भूमी एकछत्री सत्तेखाली आणली त्याच दिवशी, स्वराष्ट्र आणि स्वदेश निर्मितीचे जे महान कार्य ‘सिंधूं’नी अंगीकृत केले होते, त्या कार्याची परिपूर्ती झाली आणि भौगोलिक मर्यादेच्या दृष्टीनेही त्यांनी अंतिम सीमा हस्तगत केली. ज्या दिवशी, अश्वमेधाचा विजयी घोडा कुठेही प्रतिरोध न होता अजिंक्य असाच अयोध्येला परत आला, ज्या दिवशी त्या अप्रमेय अशा प्रभू रामचंद्रांच्या, त्या लोकाभिराम रामभद्राच्या-साम्राज्य सिंहासनावर सम्राटाच्या चक्रवर्तित्वाचे निदर्शक असे भव्य श्वेत छत्र धरले गेले आणि ज्या दिवशी आर्य म्हणविणाऱ्या नृपश्रेष्ठानींच नव्हे तर भक्तिपूर्वक हनुमान, सुग्रीव, बिभीषण ह्यांनीही त्या सिंहासनाला आपली भक्तिपूर्वक राजनिष्ठा सादर केली, तोच दिवस आपल्या खऱ्याखुऱ्या हिंदुराष्ट्राचा-हिंदुजातीचा जन्मदिवस ठरला. तोच खरा आपला राष्ट्रीय दिन. कारण आर्यांनी आणि अनार्यांनी एकमेकात पूर्णपणे मिसळून एका नवीन अशा संघटित राष्ट्राला त्या दिवशी जन्म दिला. या दिवशी पूर्वीच्या सर्व पिढ्यांचे प्रयत्न फळाला येऊन त्यावर राजकीयदृष्ट्या यशाचा कळसच चढला व त्यानंतरच्या सर्व पिढ्या ज्या करिता बुद्धिपुरस्सर किंवा अबुद्धिपुरस्सर झुंजल्या आणि झुंजता झुंजता प्रसंगी पडल्याही, त्या समान ध्येयाचा, समान ध्वजाचा आणि समान कार्याचा वारसा तेव्हापासून हिंदुजातीकडे परंपरेने चालत आला.”
(हेही वाचा – Veer Savarkar: वीर सावरकर यांच्या ५८व्या आत्मार्पणदिनानिमित्त ‘संगीत उत्तरक्रिया’ नाटकाचा शुभारंभाचा प्रयोग सादर)
लंडनमध्ये वीर सावरकरांची आणि मोहनदास गांधींची भेट झाली आणि त्यांनी वीर सावरकरांच्या (Veer Savarkar) सशस्त्र क्रांतीच्या चळवळीच्या विरोधात आपले मत नोंदविले तेव्हा क्रांतिकारकांचा हा मुकुटमणी त्यांना म्हणाला, “गांधी, तुम्हाला रामराज्य आणायचे आहे असे तुम्ही म्हणता पण तुम्हाला रावणाचा वध करायची इच्छा दिसत नाही, मग सिद्धता कशी असणार? ह्याचा भारताच्या स्वातंत्र्यप्राप्तीवर काय परिणाम होईल ह्याचा विचार करा.” रावणाचा वध म्हणजे सावरकरांना काय अभिप्रेत आहे? ते सूत्ररूपाने सांगतात, “राजकारणाचे हिंदूकरण आणि हिंदूंचे सैनिकीकरण.” आपण हिंदू आहोत आणि ह्या सूर्यमंडळात आपल्याला आपले राष्ट्र बनविण्याचा निसर्गसिद्ध अधिकार आहे असे वाटणे म्हणजे हिंदूकरण. सैनिकीकरण ह्या शब्दातून देशभक्ती, कर्तव्य कठोरता, अनुशासनबद्धता, युद्धमानता आणि मृत्युंजयता इत्यादी गुणविशेष व्यक्त होतात. ह्या धोरणाने भारताचे शासन चालेल ह्याविषयी प्रत्येक सावरकर भक्ताने जागरूक राहिले पाहिजे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community