सध्या कोरोनाचा प्रकोप सुरुच आहे. राज्यातील ग्रामीण भागात विविध ठिकाणी रुग्णांची गैससोय होत आहे, त्यांना आर्थिक अडचणीअभावी उपचार घेता येत नाही, तर अनेक ठिकाणी अत्यवस्थ रुग्णांना खाटा मिळत नाहीत, ऑक्सिजन मिळत नाही, रेमडेसिवीर इंजेक्शन मिळत नाही, अशा विविध स्वरूपाच्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे, अशा रुग्णांना शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष आणि डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशन हे मदतीचा हात देत आहे. आता या फाउंडेशनचा मुंबई आणि महामुंबईपर्यंतच सहभाग न राहता ग्रामीण भागापर्यंत व्याप पोहचला असून नाशिकमध्ये फाउंडेशनच्या वतीने मदतीचा ओघ सुरु झाला आहे.
असा सुरु आहे डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशनचा मदतीचा ओघ!
- शासकीय नियमानुसार रुग्णांना त्यांच्या वैद्यकीय बिलामध्ये सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांच्या पत्राद्वारे योग्य ती सवलत मिळवून देणे.
- डॉक्टर आणि रुग्ण यांच्यातील समन्वय साधत कुठल्याही प्रकारचा वाद होणार नाही, अशी भूमिका घेऊन उत्तम वातावरणनिर्मिती करत रुग्ण आणि त्याचे परिवार यांना स्थैर्य निर्माण करून दिले.
- डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या माध्यमातून वाटप झालेल्या शंभर रुग्णवाहिकेपैकी नाशिकचे खासदार हेमंत आप्पा गोडसे यांच्या पत्राद्वारे प्राप्त रुग्णवाहिका ही शिवसेना वैद्यकीय कक्षामार्फत सेवेसाठी नाशिक जिल्ह्याला उपलब्ध करून देण्यात आली.
- कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता नाशिकच्या परिस्थितीचा आढावा घेत प्रभाग क्रमांक 23 येथे महिन्यातून दोन वेळेस कोरोना विषाणूरोधक फवारणी करत कोरोना काळात युद्धजन्य कार्य शिवसेना वैद्यकीय कक्षामार्फत 100 स्वयंसेवकाच्या माध्यमातून उभे करण्यात आले.
(हेही वाचा : आयएनएस त्रिकंडमधून ४० टन ऑक्सिजन महाराष्ट्रात! फ्रान्सकडून भारताला मदत! )
- वैद्यकीय क्षेत्रातील रक्ताचा आणि आवश्यक प्लाझ्माचा तुटवडा पाहता विविध रक्तदान शिबिरे आयोजित करून शिवसेना वैद्यकीय पक्ष सदैव रुग्णसेवेसाठी उपस्थित राहिला आहे.
- कोरोना प्रादुर्भावाने ग्रासित रुग्णास व त्याच्या नातेवाईकांचा नि:शुल्क भोजन व्यवस्थेची व्यवस्था करून त्यांची कौटुंबिक तारांबळ शमवण्याचा प्रामाणिक प्रयत्न शिवसेना वैद्यकीय कक्षाच्या माध्यमातून केलेला आहे.
- शारीरिक आरोग्याबरोबरच मानसिक आरोग्य राखण्यासाठी बालगोपाळांना योग्य मार्गदर्शन मिळावे यासाठी तज्ञ डॉक्टर्स आणि मानसोपचार तज्ञांचे ऑनलाइन प्रशिक्षक वर्गांचे आयोजन करून योग्य दिशा निश्चितीसाठी मदत केली गेली आहे.
- वरिष्ठ नागरिकांमध्ये निर्माण होणारी भीती अध्यात्माच्या माध्यमातून कमी केली जाऊ शकते यासाठी त्यांच्या मानसिक आरोग्य राखण्याच्या दृष्टीने विविध कार्यक्रमाचे आयोजन करून शारीरिक आरोग्यासोबत मानसिक आरोग्यही सांभाळले जात आहे.
- विविध शासकीय योजनांची माहिती रुग्णांपर्यंत पोहोचवत त्यांना त्याचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न शिवसेना वैद्यकीय पक्ष त्याच्या माध्यमातून नियमित करत आहे.
- विविध मैदान निर्मितीच्या माध्यमातून शरीर संवर्धनाचे महत्त्व प्राप्त करून देत योग्य आरोग्याच्या दृष्टीने आरोग्य संवर्धक कार्यक्रमांची आखणी करून पाल्य व पालक एकत्र सभा कार्यक्रम राबवून. आरोग्य संवर्धन केले जात आहे.
- ऑक्सिजनच्या तुटवडा व तुटवड्यामुळे निर्माण होणारी परिस्थिती सर्व जाणून असून मुळावरच घाव घालायचा या उद्देशाने निसर्गच ही पूर्तता करू शकतो या उद्देशाने पाच हजार वृक्ष लागवड व संवर्धन करण्याचे भविष्यकालीन नियोजन करण्यात आले आहे.