राज्याचे अधिवेशन सोमवारपासून सुरू होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार (Ajit Pawar) यांची पत्रकार परिषद झाली.
यावेळी एकनाथ शिंदे म्हणाले की, राज्यात चांगली कामे होत आहेत. त्यामुळे विरोधकांची पोटदुखी या पत्रातून दिसून आली आहे. आज राज्यात सार्वत्रिक पायाभूत सुविधा प्रकल्प निर्माण होत आहेत. सरकार गतिमानतेने काम करत आहे. सर्व क्षेत्रात आपण प्रगती करत आहोत. अटल सेतुचं (Atal Sethu) उद्घाटन झाल्याने राज्यात मोठा प्रकल्प कार्यान्वित झाला. मराठा आरक्षणालादेखील न्याय दिला आहे. शपथ घेतली त्याप्रमाणे मराठा आरक्षण दिले. देवेंद्र फडणवीस यांनी जो निर्णय घेतला. त्यानंतर सुप्रीम कोर्टात आरक्षण टिकवण्यासाठी आम्ही सुप्रीम कोर्टाने काढलेले निरीक्षण आम्ही विचार करून मोठ्या प्रमाणात सर्वेक्षण करून १० टक्के मराठा आरक्षण देण्यात आले.
यावेळी फडणवीस म्हणाले की, विरोधी पक्षाची परिस्थिती वाईट झालेली आहे. त्यांनी अभ्यास केला पाहिजे. त्यांनी दिलेल्या पत्रावरून त्यांचे नैराश्य दिसून येत आहे, असा आरोप उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला.
(हेही वाचा – Bacchu Kadu Reaction: जरांगे-पाटील यांनी टोकाची भूमिका घेऊ नये, आतापर्यंत जे मिळवलंय ते… बच्चू कडूंनी दिला सल्ला )
कायदा सर्वांसाठी सारखाच आहे
या पत्रकार परिषदेवेळी उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, विरोधकांमध्ये अजिबात त्राण उरलेला नाही. निव्वळ टीका टिप्पणी करणे हा एककलमी कार्यक्रम सुरू आहे, असा आरोप अजित पवार यांनी केला आहे. आंदोलकांनी आपण काय बोलतो याचे भान ठेवायला हवे. काहीही बोललं, तर खपतं असं समजू नये, कारण कायदा सर्वांसाठी सारखाच आहे, असे म्हणत अजित पवार यांनी मनोज जरांगे यांना इशारा दिला आहे. सगेसोयरे यांच्याबद्दल हरकती आल्या आहेत. त्या कायद्याच्या नियमाच्या चौकटीत कशा बसतील याचा विचार करावा. त्याच्या पाठीमागे कोण आहेत, याची चौकशी केली जाईल, असे अजित पवार म्हणाले.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community