Veer Savarkar : रणछोडदासाची नव्हे तर नृसिंहाची पूजा आवश्यक!

‘जगात देवही माणसांच्या तोंडाच्या प्रार्थनांपेक्षा तोफांच्या तोंडातून येणाऱ्या प्रार्थनांकडे लक्ष देतो.’ हे सावरकरांचं वाक्य आततायी नसून मानवतावादी आहे, हे आपण समजून घेतलं पाहिजे. आपल्याकडे मानवाधिकाराचा प्रश्न येतो तेव्हा हिंदू हे मानव नाहीत, असं मानण्याची पद्धत आहे.

243
Veer Savarkar : रणछोडदासाची नव्हे तर नृसिंहाची पूजा आवश्यक!
  • जयेश शत्रुघ्न मेस्त्री

‘जगात देवही माणसांच्या तोंडाच्या प्रार्थनांपेक्षा तोफांच्या तोंडातून येणाऱ्या प्रार्थनांकडे लक्ष देतो.’ हे सावरकरांचं (Veer Savarkar) वाक्य आततायी नसून मानवतावादी आहे, हे आपण समजून घेतलं पाहिजे. आपल्याकडे मानवाधिकाराचा प्रश्न येतो तेव्हा हिंदू हे मानव नाहीत, असं मानण्याची पद्धत आहे. हिंदुंवर झालेल्या अत्याचाराला या सेक्युलरवादी मानवाधिकारात स्थान नाही. त्यामुळे सावरकरांच्या योग्य व सर्वकालीन चिरंजीव ठरणाऱ्या वाक्यांचा विपर्यास करण्यात आला. सावरकरांनी हिंदुंच्या सैनिकीकरणाची हाक दिली होती. त्यावेळी त्यांची थट्टा मस्करी करण्यात आली. मात्र आज देशाने स्वातंत्र्य मिळवून ७५ वर्षांनंतर का होईना, पण सैनिकीकरणाबद्दल जागरुकता निर्माण झाली आहे. सैनिकीकरणाच्या बळावर आपण पाकसारख्या थुकरट देशाला सहज पिटाळून लावू शकतो, त्याचबरोबर चीनसारख्या सक्षम शत्रूवरही नियंत्रण मिळवू शकतो. हे २०१४ नंतर घडलेल्या घटनांद्वारे सिद्ध झालेले आहे, जसे की ३७०, ३५अ, सर्जिकल, एअर स्ट्राइक इत्यादी. (Veer Savarkar)

सावरकरांनी १९४० साली Mechanised Army असा शब्दप्रयोग केला होता. अनेक देशांवर राज्य करणाऱ्या इंग्रजांनाही हा शब्द सुचला नव्हता हे विशेष. Mechanised Army म्हणजे यंत्रसज्ज सैन्य. आज राफेलसारखे आधुनिक लढाऊ विमान आणि इतर आधुनिक शस्त्रांचा वापर ज्याप्रकारे होत आहे, त्यावरुन आपल्याला कळते की सावरकर किती पुढचा विचार करत होते. सावरकरांसारखा (Veer Savarkar) महापुरुष इतर कोणत्याही देशात जन्माला आला असता तर तो देश त्यांना डोक्यावर घेऊन नाचला असता आणि त्यांच्या तत्वांच्या नि विचारांच्या बळावर ’महासत्ता’ म्हणून अभिमानाने मिरवत फिरला असता. पण दुर्दैवाने आपल्याकडे याच्या अगदी उलट झाले. म्हणून एक सुरक्षित, संघटित राष्ट्र म्हणून उदयास येण्यास व महासत्ता होण्याकडे मार्गक्रमण करण्यास आपल्याला विलंब झाला. (Veer Savarkar)

कोणत्याही देशाचा विकास हा त्या देशाच्या सुरक्षिततेवर अवलंबून असतो. देश सुरक्षित नसेल तर विकास कसा होणार? आपल्याला जगामध्ये शांतता निर्माण करण्यासाठी प्रयत्न करायचे आहेत. परंतु शांततेचे आवाहन दुबळे राष्ट्र करु शकत नाही. म्हणूनच सावरकरांनी (Veer Savarkar) आवाहन केल्यानुसार मुलांना लहानपणीच सैनिकीकरणाचे धडे दिले पाहिजे. सावरकर म्हणतात की, ‘स्वातंत्र्य हे राष्ट्राचे मानसिक शिक्षणावर व शारीरिक सैनिकी शिक्षणावर अवलंबून असते.’ त्यांनी इंग्रजांनाही उपदेश केला होता. त्यांचे म्हणणे होते की इंग्लंड व जर्मनीप्रमाणे अद्ययावत सैनिकी कार्यक्षमतेचे सक्तीचे सैनिकी शिक्षण सर्व हिंदुस्थानात प्रशालांत व महाविद्यालयांत सुरु केले पाहिजे. सर्व हिंदुस्थानभर रायफल चळवळीचा प्रसार झाला पाहिजे. (Veer Savarkar)

(हेही वाचा – Veer Savarkar : ज्यांना स्वातंत्र्य हवं, त्यांनी रणांगणात लढायला सिध्द झालं पाहिजे!)

आता काही लोक प्रश्न विचारतील की हा विचार कालबाह्य नाही का ठरला? तर याचे उत्तर आहे, मुळीच नाही. उलट जसाजसा काळ पुढे सरकतोय, तसतसा हा विचार कालसुसंगत होत आहे. कारण ज्याप्रमाणे आपल्याला राष्ट्रभक्त सैनिकांची आवश्यकता आहे, त्याचप्रमाणे राष्ट्रभक्त पोलीस, गृहरक्ष दल व नागरिकांचीही गरज आहे. त्यासाठी सर्व शाळांनी ५वी च्या पुढील विद्यार्थ्यांना सैनिकी शिक्षण अनिवार्य केले पाहिजे आणि कॉलेजमध्ये आल्यावर त्यांना शस्त्रशिक्षण सुद्धा दिले पाहिजे. शाळा, कॉलेजमध्ये आठवड्यातून एकदा का होईना, पण ’राष्ट्रभक्तीचा’ तास (पिरियड) असायला हवा. हे शिक्षण देताना राष्ट्रकल्याणाची भावना त्यांच्या मनात रुजवली गेली पाहिजे. ज्यामध्ये शाळाबाह्य देशभक्त संस्थांचे प्रतिनिधी येऊन मुलांना राष्ट्रकल्याणाच्या गोष्टी व तत्वे सांगतील. त्यासाठी सरकारने तसा कायदा केला पाहिजे. (Veer Savarkar)

दुसरीकडे राष्ट्रवादी संस्थांनी सैनिकीकरणाच्या शिक्षणासाठी पुढाकार घेत असताना तरुणांना घेऊन गड सर करण्याची मोहिम, प्राचीन व शिवकालीन शस्त्रांचा सराव व उद्या देशावर आतून (स्लीपर सेल्सद्वारे/देशद्रोह्यांद्वारे) आक्रमण झाले, तर ती परिस्थिती कशी हाताळायची, दंगल कशी शमवायची याचे शिक्षण दिले पाहिजे. आपल्या देशातील देशद्रोही नागरिकांनी दंगल घडवल्यामुळे देशाचे खूप नुकसान होते. जर दंगल शमवणारे स्वयंसेवक निर्माण झाले, तर पोलिसांवरचा भार खूप कमी होईल. या स्वयंसेवकांच्या दलाला ’राष्ट्रीय रक्षक सेना’ म्हणता येईल. सावरकरांच्या (Veer Savarkar) या विचारांच्या बळावर आपला देश सुरक्षित होईल आणि सुरक्षित देशांत विकासकामांची भरभराट होते. म्हणूनच तर सावरकर म्हणतात की ’आता आपण रणछोडदासाची नव्हे तर नृसिंहाची पूजा केली पाहिजे. सिंहासारख्या निदर्य नि अनिवार्य पराक्रम करणा-या त्या नृसिंहावताराचे मूर्त स्वरुप जरी अक्राळविक्राळ असले तरी त्याचे अंतःकरण हे नराचे आहे, मानवतेचे आहे. त्याचा क्रूरपणा मानवतेच्या विकासाला अत्यंत आवश्यक आहे.’ (Veer Savarkar)

(लेखक सावरकर चरित्राचे अभ्यासक आहेत.)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.