राज्यातील २५ वैद्यकीय महाविद्यालयांतील मार्ड (MARD) या निवासी डॉक्टरांच्या संघटनेने सात दिवस बेमुदत संप केला होता. मात्र आता सरकारने या संघटनेच्या मागण्या मान्य केल्या, त्यामुळे त्यांनी संप सोमवारी, २६ फेब्रुवारी रोजी हा संप मागे घेतला.
वसतीगृहाची समस्या आणि वाढीव विद्यावेतनाची मागणी करून मार्डच्या (MARD) डॉक्टरांनी बेमुदत संप सुरु केला होता. त्याचा परिणाम बाह्य रुग्ण विभागावर झाला होता. अति महत्वाच्या शस्त्रक्रिया वगळता सर्व शस्त्रक्रिया रद्द करण्यात आल्या. संपाच्या दरम्यान डॉक्टरांच्या सरकारसोबत ३ वेळा चर्चा फिस्कटली. त्यानंतर झालेल्या बैठकीत डॉक्टरांना १० हजार विद्यावेतन वाढवून देण्याचा निर्णय झाल्यानंतर डॉक्टरांनी हा संप मागे घेतला.
(हेही वाचा Maratha Reservation : मराठा आंदोलकांकडून जाळपोळ; कारवाईला विरोध करत आंदोलकांनी जाळली एसटी)
७ फेब्रुवारी रोजीच मार्डने संपाची हाक दिली होती. त्यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्यासोबत चर्चा झाली होती. यशस्वी वाटाघाटी झाल्या. त्यानंतर डॉक्टरांनी त्याच दिवशी संप मागे घेत असल्याची घोषणा केली होती. विद्यावेतनात दहा हजार रुपयांची भरीव वाढ करण्याबरोबरच दर महिन्याच्या ठरावीक तारखेला नियमितपणे वेतन देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. तसेच वसतिगृह तातडीने दुरुस्त करणार असल्याचे डॉक्टरांना यावेळी सांगितले होते. त्यानंतर डॉक्टरांनी त्याच दिवशी संप मागे घेत असल्याची घोषणा केली होती. आता मान्य झालेल्या मागण्यांची अंमलबजावणीच केली नसल्याचा आरोप करत निवासी डॉक्टर पुन्हा संप सुरू केला होता.
Join Our WhatsApp Community