Veer Savarkar : स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या आत्मार्पण दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून अभिवादन

देशाच्या स्वातंत्र्यानंतर वीर सावरकर यांनी स्वतःला राजकारणापासून दूर ठेवले. अशा वकील, क्रांतिकारक, स्वातंत्र्यसैनिक, विचारवंत, लेखक आणि समाजसुधारक वीर सावरकर यांना आत्मार्पण दिनी पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांनी अभिवादन केले आहे.

222
Veer Savarkar : स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या आत्मार्पण दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून अभिवादन

सोमवार २६ फेब्रुवारी स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या (Veer Savarkar) आत्मार्पण दिनानिमित्त पंतप्रधान मोदींनी ट्विट करत वीर सावरकर यांना अभिवादन केले आहे. पंतप्रधान मोदी (Prime Minister Narendra Modi) यांनी आपल्या ट्विटर हँडलवर लिहिले की; “देशाच्या स्वातंत्र्य आणि अखंडतेसाठी त्यांचे शौर्य आणि अतूट समर्पण भारत नेहमीच लक्षात ठेवेल. त्यांचे योगदान आम्हाला आपल्या देशाच्या विकासासाठी आणि समृद्धीसाठी प्रयत्न करण्याची प्रेरणा देते.”

(हेही वाचा – Veer Savarkar : रणछोडदासाची नव्हे तर नृसिंहाची पूजा आवश्यक!)

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Home Minister Amit Shah) आणि भारतीय जनता पक्षानेही वीर सावरकरांना (Veer Savarkar) त्यांच्या आत्मार्पण दिनानिमित्त अभिवादन केले आहे.

काळे पाणीचा छळ देखील देशाला मुक्त करण्याची त्यांची अतूट इच्छा रोखू शकला नाही : अमित शाह

आपल्या विचारांनी आणि दृढनिश्चयाने भारताच्या स्वातंत्र्यलढ्याला बळकट करणाऱ्या वीर सावरकरांना (Veer Savarkar) त्यांच्या आत्मार्पणदिनानिमित्ताने आदरांजली अर्पण करतो.

सावरकरांच्या (Veer Savarkar) आयुष्यातील प्रत्येक क्षण देशासाठी समर्पित होता. काळे पाणीचा छळ देखील देशाला मुक्त करण्याची त्यांची अतूट इच्छा रोखू शकला नाही. अस्पृश्यतेला देशाच्या विकासातील सर्वात मोठा अडथळा मानणाऱ्या सावरकरांनी आपल्या अथक संघर्षाने, प्रखर भाषणाने आणि कालातीत विचारांनी लोकांना स्वातंत्र्य चळवळीत सहभागी होण्यासाठी प्रेरित केले. आयुष्यभर आपली भाषा, आत्मसन्मान आणि देशासाठी लढणाऱ्या स्वातंत्र्यसैनिकांचा त्याग आणि देशभक्ती ही पुढील पिढ्यांना तीच दिशा दाखवत राहील.

(हेही वाचा – Veer Savarkar : स्वातंत्र्यवीर सावरकर एक द्रष्टे हिंदूसंघटक!)

२८ मे १८८३ रोजी महाराष्ट्रातील भागूर येथे जन्मलेले विनायक दामोदर सावरकर (Veer Savarkar) हे देशातील पहिले क्रांतिकारक आहेत ज्यांना दोन जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती. त्यांना अंदमानाच्या तुरुंगात ठेवण्यात आले होते. त्यांना काळ्या पाण्याची शिक्षा देखील करण्यात आली होती. देशाच्या स्वातंत्र्यानंतर वीर सावरकर यांनी स्वतःला राजकारणापासून दूर ठेवले. अशा वकील, क्रांतिकारक, स्वातंत्र्यसैनिक, विचारवंत, लेखक आणि समाजसुधारक वीर सावरकर यांना पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांनी अभिवादन केले आहे. (Veer Savarkar)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.