Veer Savarkar : स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या सामाजिक कार्याच्या आठवणी…

स्वदेशी हा शब्द ऐकताच सावरकर उठून म्हणाले, "आत्ता माझ्याबरोबर चला म्हणजे मी स्वदेशीची चळवळ काय करीत आहे हे तुम्हाला दिसेल." असे म्हणून सावरकरांनी एका स्वदेशी मालाच्या दुकानात नेऊन स्वदेशीचे प्रात्यक्षिक दाखवले.

274
Veer Savarkar : स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या सामाजिक कार्याच्या आठवणी...
  • विद्याधर नारगोलकर

वा. कृ. भावे हे महाराष्ट्र काँग्रेस समितीमध्ये होते. ते १९२९ मध्ये महाराष्ट्र प्रांतिक काँग्रेस तर्फे रत्नागिरी जिल्ह्यात ‘स्वदेशी’ या विषयावर व्याख्यानाच्या दौऱ्यावर गेले होते. रत्नागिरीला एके दिवशी संध्याकाळी रस्त्याने चालले असताना त्यांना एका बंगल्याच्या आवारातून एक कडाक्याचा वादविवाद एकू आला. ‘त्या वाद-विवादावरून त्या ठिकाणी सावरकर (Veer Savarkar) असावेत’, असे त्यांना वाटले. तेव्हा भावे आत गेले व त्यांनी ओळख करून देताना सांगितले, मी केसरीचा सहसंपादक असून इकडे स्वदेशी या विषयावर व्याख्यान देण्यासाठी आलो आहे. स्वदेशी हा शब्द ऐकताच सावरकर उठून म्हणाले, “आत्ता माझ्याबरोबर चला म्हणजे मी स्वदेशीची चळवळ काय करीत आहे हे तुम्हाला दिसेल.” असे म्हणून सावरकरांनी एका स्वदेशी मालाच्या दुकानात नेऊन स्वदेशीचे प्रात्यक्षिक दाखवले. त्यांचे ते कार्य पाहून काँग्रेसी भावे थक्क झाले आणि त्यांनी सावरकरांना (Veer Savarkar) विठ्ठल मंदिरातील त्यांच्या व्याख्यानाला बोलावले; पण सावरकर म्हणाले सरकारी प्रतिबंधनामुळे मला तुमच्या व्याख्यानाला येता येणार नाही; परंतु देवळाच्या माडीवर बसून तुमचे व्याख्यान ऐकेन. त्या काळी त्यांनी हातगाडीवर स्वदेशी माल ठेवून विकण्यास सुरुवात केली. तसेच सार्वजनिक काका यांचे नातू जोशी यांनी लिमलेटच्या गोळ्या करण्याचा कारखाना काढला होता, त्यात सुधारणा करून कारखाना चालवण्यास प्रोत्साहन दिले. (Veer Savarkar)

(हेही वाचा – CM Eknath Shinde : मराठा समाजाला १० टक्के आरक्षण देण्याचा धाडसी निर्णय घेतला)

स्वातंत्र्यवीर सावरकरांचे सामाजिक कार्य

स्वातंत्र्यवीर सावरकर (Veer Savarkar) रत्नागिरीमध्ये स्थानबद्ध असताना त्यांची दृष्टी हिंदू समाजासाठी कार्य करणारी होती. त्या वेळी गावामध्ये कार्य असल्यास महार समाजातील लोक पिपाणी व हलगी वाजवून मंगल कार्य संपन्न करत. इतर समाज त्यांना या कार्यासाठी आपल्या कार्यामध्ये बोलवत असे. सावरकरांनी हे ओळखून महार लोकांना बँकेकडून कर्ज काढून देऊन आधुनिक बँडची साधने दिली व ती त्यांना वाजवण्यास सांगितली. याचा एक फायदा असा झाला, त्यांना उत्पन्नाचे साधन पण झाले आणि स्वातंत्र्यवीर सावरकरांचे (Veer Savarkar) जाती निर्मूलनाचे कार्य वाढीस लागले. यामुळे महार लोक स्पृश्यांच्या घरात रस्त्यापासून घरातील मंगल मंडपापर्यंत जाऊ लागले. (Veer Savarkar)

पूर्वीच्या काळी गावामध्ये सिनेमा मंडळी आली की, त्याची जाहिरात गावात बँड फिरवून होत असे. रत्नागिरीमध्ये त्या वेळी प्रभातचा सिनेमा आला होता व त्याची जाहिरात होत होती. स्वातंत्र्यवीर सावरकर (Veer Savarkar) प्रभातचे मालक दामले मामा यांना भेटले व त्यांनी या महार लोकांचा बँड जाहिरातीसाठी वापरण्याची विनंती केली. ‘त्यांना रोज आठ आणे द्यावे’, असे सांगितले. दामलेमामांनी ही विनंती मान्य केली व महिनाभर जाहिरात झाली. महिना झाल्यानंतर सिनेमा दुसऱ्या गावात जाण्यास निघाला त्या वेळी शेवटच्या दिवशी दामले मामांनी सावरकरांना आपल्या घरी जेवणास येण्याचे आमंत्रण दिले. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी त्याचा पण फायदा घेतला व त्यांना अट घातली की, मी जेव्हा जेवण्यास येईन तेव्हा माझ्याबरोबर हे बँड वादकही जेवावयास येतील. दामले मामांनी हे मान्य केले व सावरकरांनी याचबरोबर सहभोजनही साध्य करून घेतले. (Veer Savarkar)

(लेखक स्वातंत्र्यवीर सावरकर स्मृती प्रतिष्ठानचे महामंत्री आहेत.)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.