- ऋजुता लुकतुके
रांची कसोटीच्या तिसऱ्या दिवशी समालोचक आणि दिग्गज क्रिकेटपटू सुनील गावसकर यांनी एका भारतीय खेळाडूबद्दल गौरवोद्गार काढले. ते म्हणाले, ‘हा पोरगा पुढे जाऊन महेंद्र सिंग होऊ शकतो.’ खरं तर तेव्हा ते २३ वर्षीय ध्रुव जुरेलच्या यष्टीरक्षणाबद्दल म्हणत होते. पण, त्यांचं हे विधान पूर्ण झाल्यानंतर आणखी २ तासांत ध्रुवने गावसकर आणि तमाम प्रेक्षकांना आपल्या फसंदाजीचीही चुणूक दाखवली. ७ बाद १७१ अशी अवस्था असलेल्या भारतीय संघाला (Indian team) त्याने दारुण अवस्थेतून बाहेर काढून ३०० च्या पार सन्मानजनक धावसंख्येजवळ नेलं. (Ind vs Eng 4th Test)
फक्त दुसरी कसोटी खेळणाऱ्या ध्रुवने धैर्य आणि चिकाटीच्या जोरावर ९० धावांची खेळी उभारली. टॉम हार्टलीच्या गोलंदाजीवर तो त्रिफळाचीत झाला तेव्हा त्याच्या पाठीवर हात फिरवणारा पहिला खेळाडू होता स्लिपमध्ये उभा असलेला इंग्लिश अनुभवी खेळाडू जो रुट. जुरेलच्या या खेळीबरोबरच आणखी एक गोष्ट लक्षात राहिली ती अर्धशतक ठोकल्यानंतर त्याने मारलेला सॅल्ययुट. कारगीलच्या युद्धात लढलेल्या वडिलांना त्याने दिलेली ही मानवंदना होती. आणि सैनिक बापाच्या मुलाने त्याच्या संघालाही असंच अडचणीतून बाहेर काढलं होतं. (Ind vs Eng 4th Test)
A Salute from Dhruv Jurel after completing his maiden fifty.
– Jurel is a son of the Kargil War Veteran. 🫡 pic.twitter.com/iZPqiyJ4DG
— Johns. (@CricCrazyJohns) February 25, 2024
(हेही वाचा – Realme 12 Pro : रिअलमीचा २०० मेगा पिक्सल कॅमेरा असलेला फोन)
ध्रुवने केली कुलदीपबरोबर ७६ धावांची महत्त्वपूर्ण भागिदारी
‘माझ्या वडिलांसाठी मी हे केलं. काल जेव्हा मी त्यांच्याशी बोलतो, तेव्हा ते मला अप्रत्यक्षपणे असं म्हणाले की, माझ्यासाठी निदान एक सॅल्युट तरी कर.’ तेच मी केलं. ध्रुवचे वडील नीम चंद १९९९ च्या कारगील युद्धाच्या वेळी सैन्यात हवालदार होते. आणि ते आघाडीवर लढलेले आहेत. नंतर त्यांनी स्वेच्छा निवृत्ती घेतली. भारतीय संघाची (Indian team) अवस्था ५ बाद १६१ अशी बिकट असताना जुरेल मैदानात उतरला. आणि सुरुवातीला त्याने कुलदीपबरोबर ७६ धावांची महत्त्वपूर्ण भागिदारी केली. आणि त्यानंतर आकाशदीप बरोबर ४० धावा जोडत त्याने संघाला ३०० पार नेलं. (Ind vs Eng 4th Test)
शतक पूर्ण करण्याच्या प्रयत्नांत हार्टलीच्या चेंडूवर शेवटी तो त्रिफळाचीत झाला. त्याचं शतक १० धावांनी हुकलं. (Ind vs Eng 4th Test)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community