अलाहाबाद उच्च न्यायालयाने ज्ञानवापी संकुलाच्या (Gyanvapi Case) व्यासजी तळघरात हिंदू पक्षांना पूजा करण्याची परवानगी देण्याच्या आदेशाला आव्हान देणारी याचिका फेटाळली आहे. वाराणसीतील ज्ञानवापी येथील व्यासजींच्या तळघरात पूजा करण्यास दिलेल्या परवानगीला स्थगिती देण्याची मागणी करणारी मुस्लिम पक्षाची याचिका अलाहाबाद उच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. न्यायमूर्ती रोहित रंजन अग्रवाल यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने व्यासजी तळघरात पूजा सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला. या प्रकरणात मुस्लिम पक्षाने वाराणसी जिल्हा न्यायालयाच्या आदेशाला उच्च न्यायालयात आव्हान दिले होते.
(हेही वाचा – Manoj Jarange : मराठवाड्यात इंटरनेट सेवा बंद; एसटी सेवाही बंद)
वाराणसी न्यायालयाच्या आदेशाला आव्हान :
३१ जानेवारी रोजी वाराणसी जिल्हा न्यायालयाने ज्ञानवापीच्या व्यास (Gyanvapi Case) तळघरात हिंदूंना पूजा करण्याची परवानगी दिली, त्यानंतर अंजुमन समझौता मशीद समितीने वाराणसी न्यायालयाच्या आदेशाला आव्हान दिले.
(हेही वाचा – CM Eknath Shinde : युरोपियन देशांना कुशल मनुष्यबळ पुरविण्यासाठी महाराष्ट्राचा पुढाकार)
न्यायालयाने निकाल राखून ठेवला :
अलाहाबाद उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती रोहित रंजन अग्रवाल यांनी अंजुमन समझौता मशीद समितीने दाखल केलेल्या पहिल्या याचिकेवर सुनावणी केली. दोन्ही बाजूंचे युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने निकाल राखून ठेवला आहे. (Gyanvapi Case)
अलाहाबाद उच्च न्यायालयाचा निर्णय “व्यास तळघरात पूजा सुरूच राहणार”
मुस्लिम पक्षाची याचिका अलाहाबाद उच्च न्यायालयाने फेटाळली#hindusthanpostmarathi #marathinews #breaking #trending #TrumpIsNotWell #MondayMotivation #DEPTH #RightToTreatment #gyanvapi #supremecourt #alahabad pic.twitter.com/eY0R1I8GM6
— Hindusthan Post Marathi (@HindusthanPostM) February 26, 2024
व्यासजी तळघरात सुरू असलेली पूजा सुरूच राहील :
अलाहाबाद उच्च न्यायालयाने ज्ञानवापी संकुलातील (Gyanvapi Case) व्यासजींच्या तळघरात पूजा करण्यास परवानगी देण्याच्या न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान देणारी मुस्लिम पक्षाची याचिका फेटाळली आहे. हिंदू पक्षाचे वकील विष्णू शंकर जैन म्हणाले की, अलाहाबाद उच्च न्यायालयाने अंजुमन समझौताच्या आदेशाविरूद्ध पहिली याचिका फेटाळली आहे. वाराणसी जिल्हा न्यायालयाच्या १७ आणि ३१ जानेवारीच्या आदेशाला अलाहाबाद उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले होते. न्यायालयाने आपल्या आदेशात म्हटले आहे की, ज्ञानवापी संकुलाच्या व्यास तळघरात सुरू असलेली पूजा सुरूच राहील.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community