- ऋजुता लुकतुके
भारताचा अव्वल फिरकीपटू रवीचंद्रन अश्विनने रांची कसोटीत अनिल कुंबळेच्या एका विक्रमाशी बरोबरी केली आहे. दोघांनीही डावांत ५ बळी टिपण्याची किमया एकूण ३५ वेळा केली आहे. आणि भारताकडून हा विक्रम आहे. इंग्लंडच्या दुसऱ्या डावात अश्विनने आतापर्यंतची मालिकेतील सर्वोत्तम कामगिरी नोंदवताना ५१ धावांत ५ बळी टिपले. बेन डकेट आणि ऑली पोप यांना लागोपाठच्या चेंडूवर बाद करत अश्विननेच इंग्लिश डावाला खिंडार पाडलं. (Ind vs Eng 4th Test)
आणि त्यानंतर जो रुट हा महत्त्वाचा फलंदाजही त्यानेच पायचीत बाद केला. तळाच्या बेन फोक्स आणि जिमी अँडरसन यांना बाद करत इंग्लिश डाव गुंडाळण्याचं कामही त्यानेच केलं. (Ind vs Eng 4th Test)
Ashwin goes level with Kumble’s total of 35 Test five-wicket hauls 🔥 pic.twitter.com/l78lg2L6oV
— ESPNcricinfo (@ESPNcricinfo) February 25, 2024
(हेही वाचा – Ind vs eng 4th Test : ‘हीरो बनू नकोस,’ असं रोहितने सर्फराझला का सुनावलं?)
तब्बल ६७ वेळा डावांत ५ बळी
अनिल कुंबळेनं यापूर्वी भारताकडून सर्वाधिक वेळा म्हणजे ३५ वेळा डावांत ५ बळी टिपले होते. या विक्रमाशी आता अश्विनने बरोबरी केली आहे. तर जागतिक स्तरावर दोघं आता या बाबतीत चौथ्या स्थानावर आहेत. पहिल्या स्थानावर अर्थातच, मुथय्या मुरलीधरन आहे. त्याने तब्बल ६७ वेळा डावांत ५ बळी मिळवले आहेत. तर ऑस्ट्रेलियन दिग्गज फिरकीपटू शेन वॉर्नने अशी कामगिरी ३७ वेळा केली आहे. तर न्यूझीलंडचे तेज गोलंदाज रिचर्ड हॅडली यांनी ३६ वेळा ५ गडी बाद केले आहेत. (Ind vs Eng 4th Test)
या मालिकेत आतापर्यंत रवीचंद्रन अश्विनने ११ बळी मिळवले आहेत ते ३८ धावांच्या स्ट्राईक रेटने. (Ind vs Eng 4th Test)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community